Thalapathy Vijay Jana Nayagan massive competition on OTT platforms  Pudhari photo
मनोरंजन

Thalapathy Vijay | OTT वर Jana Nayagan साठी कोट्यवधींची बोली? मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा

OTT वर ‘जननायकन’साठी कोट्यवधींची बोली? मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा

स्वालिया न. शिकलगार

Vijay यांच्या आगामी Jana Nayagan चित्रपटाभोवती प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून OTT rights साठी अनेक मोठ्या streaming platforms मध्ये स्पर्धा सुरू असल्याचे वृत्त आहे. विजय यांच्या लोकप्रियतेमुळे आणि हा त्यांचा राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा महत्त्वाचा चित्रपट मानला जात असल्याने चित्रपटाची बाजारात मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावरही या OTT डीलविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या आगामी जन नायकन या चित्रपटाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच त्याच्या ओटीटी राईट्स संदर्भात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समध्ये स्पर्धा सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. या चर्चेमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘जननायकन’ हा फक्त एक मोठा तमिळ चित्रपट नसून विजय यांच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे. कारण हा चित्रपट त्यांच्या राजकीय प्रवासाच्या पार्श्वभूमीवर येत असल्याने त्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, हा विजय यांचा अभिनय क्षेत्रातील शेवटच्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळेच OTT कंपन्यांमध्ये या चित्रपटासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क मिळवण्यासाठी अनेक टॉपचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सरसावले आहेत. कोट्यवधींची बोली लागत असून त्यांच्यामध्ये सध्या तीव्र स्पर्धा सुरू आहे. काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागूनही विजय यांची प्रचंड लोकप्रियता आहे. अलीकडेच पार पडलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर त्यांच्याभोवती निर्माण झालेले प्रबळ राजकीय वलय यामुळे हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये येईल, असे म्हटले जात आहे.

एका रिपोर्टनुसार, रिलीज पूर्वी संबंधित अडचणींमुळे एका बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मने जन नायकनचा ओटीटी करार रद्द केला होता. त्या प्लॅटफॉर्मने सुरुवातीला जननायकनचे ओटीटी हक्क मिळवले होते. परंतु, चित्रपटाला रिलीज संबंधित काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर, तो आधीचा करार रद्द करण्यात आल्याचे समोर आले.

यामुळे हा चित्रपट डिजिटल रिलीज होईल की नाही, याबात संभ्रमावस्था होती. पण आता स्थिती पूर्णपणे बदलली आहे. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक ओटीटी कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. या चित्रपटाच्या स्ट्रीमिंग राईट्ससाठी चुरस लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मोठ्या स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म्स ने चित्रपटाच्या डिजीटल राईट्ससाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा आहे. अधिकृत आकडे समोर आले नसले तरी डील झाल्यास साऊथ सिनेमा मार्केटमध्ये हा आतापर्यंतच्या मोठ्या डिल्सपैकी एक ठरू शकतो. दरम्यान, चित्रपटाच्या थिएटर रिलीज बाबतही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT