Jana Nayagan Advance Booking updates  pudhari photo
मनोरंजन

Jana Nayagan Advance Booking |'जन नायकन' ॲडव्हान्स बुकिंगचा धडाका; १५ कोटींचा टप्पा पार, 'लिओ' अन् 'GOAT' ला देणार टक्कर?

'जन नायकन' ॲडव्हान्स बुकिंगचा धडाका; १५ कोटींचा टप्पा पार, 'लिओ' अन् 'GOAT' ला देणार टक्कर?

पुढारी वृत्तसेवा

थलपती विजयच्या बहुचर्चित 'जन नायकन' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कामगिरी करत सुमारे १५ कोटी रुपयांच्या प्री-सेल्सचा टप्पा गाठल्याची चर्चा आहे. भारतासह परदेशातही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, 'लिओ' आणि 'GOAT'च्या विक्रमांनाही हा चित्रपट आव्हान देईल का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

अभिनेते विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट मानल्या जाणाऱ्या 'जन नायकन'च्या रिलीजसाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. २३ जुलै रोजी हा बहुचर्चित चित्रपट जगभर रिलीज होतोय. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगने भारतात तब्बल १५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता विजय यांचाच चित्रपट 'लिओ' आणि 'GOAT' ला जन नायकन टक्कर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिग्दर्शक एच. विनोद यांच्या दिग्दर्शित हा राजकीय ॲक्शन-ड्रामा विजय यांचा अभिनयातील निरोपाचा चित्रपट आहे. त्यामुळे तमिळनाडूसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये या चित्रपटासाठी फॅन्समध्ये उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी २३ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून विशेष प्रीमियर शो आयोजित करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवसासाठी १५ कोटींहून अधिक कमाई

मीडिया रिपोर्टनुसार, २१ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत 'जन नायकन'ने पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून ब्लॉक केलेल्या जागांसह १५.०९ कोटी रुपयांची कमाई नोंदवली आहे. तमिळ आवृत्तीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. ५,०९१ शोसाठी ४.१७ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झालीय. यामधून १०.२२ कोटी रुपयांची कमाई झालीय.

तेलुगू भाषेत सुमारे १२ लाख रुपये, तर हिंदी पट्ट्यात केवळ २९ हजार रुपयांच्या आसपास कमाई केली आहे.तामिळनाडूत ६.७४ कोटी रुपये, कर्नाटक ४.८८ कोटी रुपये, तर केरळमध्ये १.८ कोटी रुपयांचे बुकिंग झाले आहे.

'लिओ' आणि 'GOAT'ला देणार टक्कर?

१९ जुलैपासून ॲडव्हान्स बुकिंग सुरू असून शो हाऊसफुल्ल होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT)'ने भारतात पहिल्या दिवशी २९.८३ कोटी रुपयांचे ॲडव्हान्स बुकिंग केले होते. 'लिओ'ने ४६.३६ कोटी रुपये कमावले होते.

या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, प्रियामणी, नारायण आणि नास्सर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT