पुढारी ऑनलाईन
पाच चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डॅनियल क्रेग याला ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते खर्याखुर्या राजकीय मुत्सद्दी किंवा गुप्तहेरांना दिला जाणार्या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. डॅनियलला कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकल अँड सेंट जॉर्ज (सीएमजी) किताब दिला आहे.
आतापर्यंत हा सन्मान केवळ खर्या मुत्सद्दी किंवा गुप्तहेरांना मिळत होता; पण एलिझाबेथ द्वितीय यांनी हा सन्मान डॅनियल क्रेगला अर्थात जेम्स बाँड या काल्पनिक गुप्तहेराला देऊन ही परंपरा तोडली आहे. यापूर्वी डॅनियलला ब्रिटनच्या नौदलाने मानद कमांडर किताब दिला आहे. याशिवाय बाँडपटांचे निर्माता बार्बरा ब्रोकोली आणि मायकल विल्सन यांनाही यापूर्वीच कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (सीबीई) किताब दिला गेला आहे.