पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या वडिलांना पाच जणांनी २५ लाखांना गंडा घातला आहे. सरकारी आयोगात उच्च पद देण्याचे आमिष दाखवून या टोळीने सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक जगदीश सिंह पटानी यांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पाच जमांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
शुक्रवारी शाम बरेली कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी म्हटले आहे, "शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, जूना अखाडेचे आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग आणि एक अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूक, धमकी आणि जबरदस्ती वसूलीचे प्रकरण समोर आले आहे. "
जगदीश पटानी यांच्या माहितीनुसार, बरेलीचे सिव्हिल लाईन्स परिसरातील रहिवासी जगदीश पटानी यांनी आरोप केले आहेत की, शिवेंद्र प्रताप सिंह, यांना ते वैयक्तिकपणे ओळखतात. त्यांनी दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकाश यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी आपले मजबूत राजकीय संबंध असल्याचा दावा केला आणि पटानी यांना सरकारी आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष वा त्याप्रकारचे कुठलेही प्रतिष्ठित पद मिळवून देण्येच आश्वासन दिले.
पटानी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून २५ लाख घेतले. "५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २० लाख तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्यात आले. जेव्हा तीन महिन्यांपर्यंत कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसले तेव्हा त्या लोकांनी पैसे परत देण्याचे वचन दिले. जेव्हा पटानी यांनी आपले पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी धमक्या देणे सुरु केले आणि आक्रामक व्यवहार करणे सुरू केले.
जगदीश पटानी यांनी पुढे आरोप केले की, गंडा घालणाऱ्यांनी राजकीय संबंध चांगले असल्याचे खोटे दावे करत आपल्या साथीदाराला अधिकारी सांगत दिशाभूल केली. त्याचे नाव हिमांशु होते. मोठी फसवणूक झाल्यानंतर आणि संशय आळ्यानंतर जगदीश पटानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांना एफआयआर दाखल केली आहे.