मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिसकडून तीन topless फोटो शेअर करत चाहत्यांना ‘स्पेशल’ संदेश!

Pudhari News

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोशल मिडीयावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. तिचे अनेक चाहते तिला या ना त्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फॉलो करतात. त्यामुळे जॅकलीनच्या इंस्टाग्रामवर ४६ मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. त्यावर जॅकलीनने आपले topless फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे खुप व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. जॅकलीनच्या या फोटोंना जबरदस्त लाइक आणि शेयर केले जात आहेत. 

इंस्टाग्रामवर जॅकलीनने आपले काही हॉट फोटो टाकले आहेत. ज्यात ती टॉपलेस असून हातात गुलाबाचे गुच्छ पकडले आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने चाहत्यांना, 'लव्ह यू. थॅक्यू।' असे आभार मानताना कॅप्शन दिले आहे. या फोटोतील तिचा हॉट आणि बोल्ड लुक पाहून चाहते पुर्ण वेढावले असून आपली प्रतिक्रीया देताना दिसत आहेत. तसेच जॅकलीन चाहते इंस्टाग्रामवर तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेयर करत आहेत.

मलायका @47 तरीही fit and fine! फिगर मेंटेनसाठी 'हा' आहे डाएट प्‍लान

तसेच चाहते तिचा आगामी येणाऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. जो एक हॉरर-कॉमेडी भूत पोलिस चित्रपट असून यात सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर स्टार कास्ट आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन पवन कृपलानी यांनी केले असून याच्या आधी त्यांनी फोबिया आणि रागिनी एमएमएस या चित्रपटांचे डायरेक्शन केले आहे.

याबरोबरच जॅकलीन सलमानच्या बहुचर्चीत किक २ मध्येही दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे किक २ चित्रपटाची घोषणा तिच्या वाढदिवसा दिवशी करण्यात आली होती. मात्र अजूनही इतर स्टार कास्ट नावे जाहीर करण्याता आलेली नाहीत. २०१४ साली आलेला किक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यात रणदीप हुड्डा याने पोलिस अधिकाऱ्याची भुमिका केली होती. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT