पुढारी ऑनलाईन
नेटफ्लिक्सच्या '365 डेज' या चित्रपटामुळे मोठी फॅन फॉलोविंग लाभलेला इटालियन अभिनेता मिशेल मोरोन (jacqueline fernandez and Michele Morrone ) याला बॉलीवूडमध्येही खूप मागणी आहे. मध्यंतरी करण जोहर त्याला बॉलीवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चा होत्या. तथापि, आता त्याचे बॉलीवूडमध्ये पदार्पण होत आहे. मिशेल आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका गाण्याचे पहिले पोस्टर रीलिज झाले आहे. (jacqueline fernandez and Michele Morrone )
'मुड मुड के' असे या गाण्याचे बोल आहेत. यात दोघेही रोमँटिक अवतारात दिसून येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातून हे गाणे तयार केले गेले आहे. जेव्हा मिशेल आणि जॅकलिन यांचा पहिला फोटो व्हायरल झाला होता तेव्हापासून चाहत्यांना या गाण्याची प्रतीक्षा होती. तेव्हा अनेकांना वाटले होते की दोघांचा चित्रपट येतो आहे; पण हा म्युझिक व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांचे हे गाणे आहे. शक्ती मोहनने कोरिओग्राफी केली आहे. 8 फेब्रुवारीला या गाण्याचा टीझर समोर येणार आहे.