ईशा वर्माचे रूपाली गांगुलीवर गंभीर आरोप केले आहेत. instagram
मनोरंजन

ईशा वर्माचे रूपाली गांगुलीवर गंभीर आरोप; वडील अश्विन सोबत विवाहबाह्य संबंध अन्...

Esha Verma-Rupali Ganguly Controversy | 'रुपाली गांगुलीने माझ्या आई-वडिलांना वेगळं केलं'

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुलीवर ईशा वर्माने गंभीर आरोप केले आहेत. तिचे वडील अश्विन वर्मासोबत रुपाली गांगुलीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे ईशाने म्हटले आहे. इतकेच नाही तर रुपालीने तिच्या आई-वडिलांना देखील वेगळे केले, असा गंभीर आरोप तिने केला आहे.

काय म्हणाली ईशा वर्मा?

ईशा वर्माने म्हटले की, कशाप्रकारे तिची आई आणि ती चिंतेत होत्या आणि संघर्षमय जीवन जगत होत्या. ईशाने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं की, "माझा जन्म झाला आणि मला लहानाची मोठी तिथेच झाले. माझ्या वडिलांनी दोन लग्ने केली. माझी बहिण ही वडील अश्विन यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे आणि मी दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. माझ्या आईचे नाव साधना वर्मा आहे, प्रियंका वर्मा नाही."

मी खूप सारे कॉमेंट्स आणि द्वेषाने भरलेल्या प्रतिक्रिया वाचल्या. खासकर रूपालीच्या फॅन्स कडून ट्रोल व्हावं लागलं.

'रुपाली गांगुली चांगली महिला नाही, या मुखवट्यामागे वेगळा चेहरा'

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवरील आरोप तेव्हा समोर आले होते, जेव्हा २०२० मध्ये ईशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट आता पुन्हा व्हायरल होत आहे. रुपाली गांगुलीने २०१२ मध्ये बिझनेसमन अश्विन वर्माशी लग्न केले होते. अश्विन वर्मा यांची आधी दोन लग्न झाले होते.

खास बातचीतमध्ये २६ वर्षीय ईशा वर्माने सांगितले की न्यू जर्सी, यूएसमध्ये राहते. तिने आपलं दु:ख व्य्क्त केलं. ईशाचे म्हणणे आहे की, तिचा उद्देश केवळ रुपालीचे सत्य समोर आणणे आहे. जेव्हा तिने रुपाली गांगुलीविषयी सांगितलं, तेव्हा रुपालीचे फॅन्सनी तिला ट्रोल्स करणे सुरु केलं. ते माझ्या इन्स्टाग्रामवरील फोटो, बिकिनी फोटोंच्या आधारावर मला जज करत आहेत. पण सत्य हे आहे की, मी अमेरिकेत राहते. इथे बिकिनी घालणे नार्मल आहे. मला यावरून जज करू नये. ही अजिबात पब्लिसिटी स्टंट नाही. मी केवळ न्यायाची अपेक्षा करतेय.

ईशाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

२०२० मध्ये फेसबूकवर एक पोस्ट केलं होतं, त्यामध्ये रुपालीचा स्वभाव क्रूर आणि कंट्रोलिंग असल्याचे सांगितले होते. या पोस्टमध्ये हेदेखील लिहिलं होतं की, त्यांचे अनेक वर्ष अफेयर चाललं आणि माझ्या आईला मानसिक-भावनिक त्रास दिला. त्यांच्या अफेअरमुळे आमचं आयुष्य उद्धवस्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT