आईप्रमाणेच 'ईशा' अंबानीने 'IVF' द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म File Photo
मनोरंजन

Isha Ambani On IVF| आईप्रमाणेच ईशा अंबानीने 'IVF' द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म

ईशा अंबानी यांचा मुलाखतीत महत्त्वाचा खुलासा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांना एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नेंसीसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे. तिने 'आई निता अंबानींप्रमाणेच तिच्या जुळ्या मुलांचा जन्म हा IVF द्वारे झाल्याचे या मुलाखतीत म्हटले आहे.

आयव्हीएफ (IVF) ही एक सामान्य प्रक्रिया; ईशा अंबानी

मुलाखतीत ईशाने पुढे सांगितले की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याचा हा भाग महिलांना सांगून आयव्हीएफ (IVF) ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे सांगायचे आहे. मला आशा आहे की, यामुळे तरी लोक आयव्हीएफबद्दल उघडपणे बोलतील आणि ते निषिद्ध बनवणार नाहीत. या बद्दल कोणालाही लाज किंवा एकटे वाटू नये. ही एक कठीण प्रक्रिया आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला शारीरिक थकवा जाणवतो, असेही तिने स्पष्ट केले.

बरेच लोक IVF बाळांकडे वेगळ्या नजरेने पाहतात; ईशा यांनी व्यक्त केला खेद

ईशा अंबानी यांच्या बोलण्यावरून स्पष्टपणे दिसून येत होते की, "समाजात IVF बद्दल लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत आणि आजही बरेच लोक IVF बाळांकडे वेगळ्या नजरेने पाहतात" असा खेद देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनीही IVF द्वारेच मोठ्या मुलीला जन्म दिल्याचेही ईशा यांनी स्पष्ट केले. दरम्यान 'लोक IVF बाळांकडे वेगळ्या नजरेने पाहतात जे योग्य नाही",असेही त्या म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT