मुंबई : पुढारी ऑनलाईन
दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित 'काला' या चित्रपटात तो एन्ट्री करत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होत आहे. दिग्दर्शक अन्विता दत्त हे चित्रपटाचे दिग्दर्शक केलं आहे. चित्रपटात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डमरीदेखील दिसणार आहे. बर्फाच्छादित प्रदेशात या चित्रपटाचे शूटींग झालं.
या टिझरमध्ये बर्फाच्छादित प्रदेशात एका चित्रपटाचे शूटींग सुरु असल्याचे दिसते. तर अभिनेता बाबिलसोबत तृप्ती डमरी ही काहीतरी शोधताना दिसत आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार, हे समजणार आहे.
अन् डोळ्यात आलं पाणी…
नुकतेच बाबिलने फिल्मफेअर सोहळ्याला हजेरी लावली होती. इरफान खानला एक ट्रिब्यूट म्हणून फिल्मफेअरच्या विशेष अवॉर्डने गौरवण्यात आलं. यावेळी इरफानचा मुलगा बाबिलने हा ॲवॉर्ड स्वीकारला. यावेळी बाबिल खूप भावूक झालेला दिसतो. दरम्यान, वडिलांच्यावतीने हा अॅवॉर्ड स्वीकारताना बाबिलला अश्रू अनावर झाले. दरम्यान, बाबिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
बाबिल आता मोठ्या पडद्यावर काय कमाल दाखवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.