पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला त्याच्या युट्यूब शो, इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. समय रैनाला १७ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
रैनाच्या वकिलाने सायबर सेलला समय रैना अमेरिकेत असल्याने तो १७ मार्च रोजी परत येणार असल्याचे कळवले होते. पण, पोलिसांनी त्याला हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याला सायबर सेलकडून समन्स बजवण्यात आले. मुंबई पोलिसांनी रैनाच्या टीमला स्पष्टपणे सांगितले होते की, पोलिस तपास इतके दिवस थांबू शकत नाही. त्यामुळे चौकशी सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत समयला पोलिसांसमोर हजर राहावे लागेल. या प्रकरणात खार पोलिसांनी आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवले आहेत.
यामध्ये शोमध्ये जज असलेले रणवीर अल्लाहबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्व माखीजा तसेच शो ज्या स्टुडिओमध्ये झाला, त्या स्टुडिओचे मालक बलराज घई यांच्यासह शोशी संबंधित तीन टेक्निकल लोकांचा समावेश आहे.