मनोरंजन

अंत्यसंस्कारावर आधारीत ‘हे’ सहा चित्रपट पहायलाच हवेत!

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. दररोज लाखो रुग्णांची वाढ होत आहे, तर दुसरीकडे हजारो रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं चित्र आहे. दररोज होणारे मृत्यू आणि त्यानंतर अंत्यसंस्कारांच्या दृश्यांमुळे मन सुन्न होत आहे. मानवी मृतदेहावरील अंत्यसंस्काराचा विषय निघालाच आहे तर या अंत्यसंस्काराशी संबधीत काही महत्त्वाचे चित्रपट प्रेक्षकांनी जरूर पहावे; जेणेकरून आपल्या जाणीवा-नेणीवांमध्ये आणखीनच भर पडेल.

चित्रपट रसिकांनो.. सिनेमाच्या असंख्य परिभाषा आहेत. त्यातील एक म्हणते की सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. जे समाजात घडतं आहे ते जसंच्या तसं दाखवण्यासाठीचं ते एक सक्षम माध्यम आहे. अस्वस्थ वर्तमान मोठ्या पडद्यावर दाखवण्याची हिम्मत चित्रपट या माध्यमातून करता येत. अलीकडेच बिहारच्या बक्सरमधून अशीच काही अस्वस्थ करणा-या बातम्या आणि छायाचित्रे समोर आली आणि या घटनेने सारा देश हळहळू लागला. 

गंगा नदी पाण्यात मृतदेह तरंगत होते. त्यानंतर अंत्यसंस्कारा अभावी मृतदेह नदीत फेकून दिल्याच्या बातम्या समोर आल्या. या घटनेनंतर या प्रकरणात प्रशासन की जनता दोषी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. असाही तर्क लावला जावू लागला की, गंगेच्या पवित्र पाण्यात मृतदेह सोडल्याने मुक्ती मिळते म्हणून मृत्यू झालेल्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी नदी सोडले. ही परंपरा खूप जूनी असल्याचंही अनेकांनी म्हटलं. 

असो, इथं काही राजकीय टीका-टीप्पणी करायची नाहीय. आपल्या देशात विविध जाती धर्मानुसार मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्याच्या पद्धती पूर्वापार प्रचलीत आहेत. मग त्यात मृतदेह नदीत सोडणे या ही प्रकाराचा सामावेश आहे. नुकताच बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीच्या किना-याला पहायला मिळाला. 

अंत्य संस्कारा बाबतच्या परिस्थीतीच चित्रण अनेक चित्रपटांनी केले आहे. तेही देशाच्या विविध भागातील विविध भाषेतून. आज तुम्हाला अशाच काही चित्रपटांचा परिचय करून देणार आहोत. जिथे अंत्य संस्कारासारख्या मूलभूत अधिकाराशी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथं चर्चा केवळ अंत्यसंस्काराबाबत नाहीय. चर्चा अधिकाराचीही आहे. चर्चा आहे पांढ-या कापडात गुंडाळलेल्या मृत व्यक्तीच्या हक्काची. 

संस्कार (१९७०) : दिग्दर्शक : पट्टाभिरामा रेड्डी टिकावारपू

संस्कार हा चित्रपट लेखक यूआर अनंतमूर्ति यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत आहे. कर्नाटकातील एक लहानसे गाव. जिथे ब्राह्मण समाजाची वसती जास्त आहे. हे लोक परंपरावादी आहेत. परंपरेचे काटेकोरपणे पालन करताना दिसतात. याच गावातल्या दोन व्यक्तीरेखांची गोष्ट आहे. पहिली व्यक्तीरेखा आहे प्रणेशाचार्य. प्रणेशाचार्य हा वेदपाठी ब्राह्मण आहे. आपल्या समाजाच तो नेतृत्व करतो. तो जीवनात मोक्ष प्राप्त करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो काहीही समर्पित करण्यासही तयार आहे. प्रणेशाचार्य ही व्यक्तीरेखा साकारलीय गिरीश कर्नाड यांनी. 

तर दुसरी व्यक्तीरेखा आहे नारायनप्पा. नारायनप्पा हा ही जन्माने ब्राह्मण आहे. पण कर्माने तो ब्राम्हण नाहिय. तो मांसाहारी आहे. मित्रांसोबत तो दारू पितो. एका वेश्येसोबत त्याचे संबंध आहेत. गावातील इतर ब्राम्हणांना तो पसंत नाहीय. एका दिवशी अचानक फणफणून ताप आल्याने नारायनप्पाचा मृत्यू होतो. आता अंत्यसंस्काराचा अधिकार हा केवळ गावतल्या ब्राम्हणांकडे असतो. मात्र, गावातील कुणीही ब्राह्मण नारायनप्पाच्या मृतदेहाला हाथ लावायला तयार नाहीय. हे सर्व ब्राम्हण असं सामजतात की नारायनप्पाच्या मृतदेहाला हात लावल्यास ते भ्रष्ट होतील.

अशा परिस्थितीत तोडगा काढण्याची जबाबदारी येते ती प्रणेशाचार्य याच्यावर. तो काय तोडगा काढतो, हाच संपूर्ण चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. यूट्यूबवर तुम्ही हा कन्नड भाषेतील चित्रपट पाहू शकता.

ओंतरजली यात्रा (१९८७) : दिग्दर्शक : गौतम घोष

ओंतरजली यात्रा हा बंगाली चित्रपट कमल कुमार मजूमदार यांच्या 'महायात्रा' कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय तो ही सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीमध्ये. चित्रपटाची गोष्ट आहे एका सामान्य व्यक्तीची. ज्याचं वय झालं तर आहेच पण तो आता काही दिवसांचा सोबती आहे. त्याला एक ज्योतिषी सांगतो की मृत्यूनंतर मुक्ती तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुझी पत्नी जळत्या चितेवर सती जाईल. हा तो काळ होता जेव्हा सती प्रथा बंद होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. असं असूनही त्या मरणाच्या दारात असणा-या वृद्धाचे नातेवाईक एका मुलीला शोधून काढतात. जी एका अत्यंत गरीब घरातली असते. कसंही करून तिला वृद्धा सोबत लग्नासाठी तयार केलं जात. मात्र, स्मशाना घाटावर राहणारा दारुडा या अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवण्याचा निर्णय करतो. या अन्याया विरुद्धच्या लढयत तो दारुडा यशस्वी होतो की नाही याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळेल.

घाटश्राद्धा (१९७७) : दिग्दर्शक : गिरीश कसरावल्ली

घाटश्राद्धा हा यूआर अनंतमूर्ति यांच्याच आणखी एका कादंबरीवर आधारीत चित्रपट. चित्रपटातील उडुपा हे पात्र आपल्या गावात एक वैदिक पाठशाला चालवत असतो. अर्थिक चणचण आहे. त्यामुळे उडुपा घरातच शिकवणी घेत असतो. उडुपाच्या व्यतीरिक्त त्याच्या घरात त्याची विधवा मुलगी आहे. तिचं नाव यमुना आहे. यमुनाचे शाळा मास्तरवर प्रेम जडते. अशातच दोघांचे शारिरीक संबध येतात आणि त्यातून यमुनाला गर्भधारणा होते. पण याची कुणालाच खबर नाहीय. एकदा कुठल्यातरी कामाने उडुपाला शहरात जावं लागतं. त्याच्या माघारी शाळेची परिस्थीती बिघडते. त्यातच सगळ्या गावाला बघता बघता यमुनाच्या गर्भारपणाविषयी समजतं. 

एक दिवस उडुपा शहरातून गावाला येतो. त्याला आपल्या मुलीच्या गर्भवती असल्याचे समजते. यानंतर तो संतप्त होतो आणि एक टोकाचा निर्णय घेतो. रागाच्या भरात तो आपल्या गर्भवती जिवंत मुलीचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतो. सगळा गाव एका बाजुला आहे. तर दुस-या बाजूला एकटी यमुना. अशा अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना यमुना कशी करते. हीच या चित्रपटाची कथा आहे. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. 

ओका ऊरी कथा (१९७७) : दिग्दर्शक : मृणाल सेन

हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद कुणाला माहीत नाहीत. हिंदी साहित्यावरची त्यांची छाप अमिट आहे. प्रेमचंद यांनी लिहिलेल्या कथेपैकी एक प्रसिद्ध कथा म्हणजे कफन. मृणाल सेन दिग्दर्शित ओका ऊरी कथा या चित्रपटाचा ती आधार आहे. कथा आहे वेंकईया आणि किस्तईया बाप आणि मुलाची. हे दोघे आपल्याच मस्तीत राहतात. दुनियादारीशी यांचा काहीच संबध नाहीय. ते असं म्हणत असतात की कष्ट करणारा शेतकरी मूर्ख असून ते श्रीमंताची सेवा करण्यात मश्गुल असतात. म्हणूनच वेंकईया आणि किस्तईया यांना काम-धंदा करण्यात स्वारस्य नाहीय. 

तिथि (२०१५) : दिग्धर्शक : राम रेड्डी

'तुम्ही या चित्रपटातील व्यक्तीरेखांना कधीच विसरू शकणार नाही', असं म्हटलं होतं 'गॉडफादर'चे दिग्दर्शक फ्रांसिस फोर्ड कोपोला यांनी. ४ पिढ्यांची कथा. सर्वात पहिला सेन्चुरी गौडा. गावात मेंढीपालन करतोय. दुसरा आहे गौडाचा मुलगा गडप्पा. गडप्पा आपल्याच मस्तीत मस्त असा. दुनियादारीची कसलीच खबर नाही. तिसरा, गडप्पाचा मुलगा थम्मपा. त्यानंतर थम्मपाचा मुलगा अभि, चौथा सदस्य. सळसळत्या तारुण्यात असणारा आनि गावातल्या एका मुलीवर प्रेम करणारा. एक दिवस गौडाचा मृत्यू होतो. मुलाला आपल्या बापाच्या मृत्यूच देणंगेणं नाहीय. त्यामुळे गौडाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतो तो थम्मपा. अंत्य संस्काराच्या बहाण्याने गौडाची ५ एकर जमीन बळकावून ती विकण्याचा त्याचा विचार करतो आणि कामाल लागतो. यात तो काय-काय झोल करतो ते पाहण्यासारखं आहे. जेव्हा तिथि (दिवस) म्हणजेच गौडाच्या मृत्यूनंतर ११ दिवसांनंतरची तारीख येते, तेव्हा काय होतं. हीच चित्रपटाची कथा आहे. 

 

दीक्षा (१९९१) : दिग्दर्शक : अरुण कौल

दीक्षा हा १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट घाटश्राद्धाचा हिंदी रीमेक. एक व्यक्तीच्या पाच मुलांचा मृत्यू होतो. सहावा मुलगा जन्म घेतो. पण पश्चाताप म्हणून ती व्यक्ती या नवजात बालकाला गुरुकुलमध्ये सोडून देतो. हे गुरुकुल आचार्य उड़ुप पंडित यांचं असतं. आचार्य उड़ुप पंडित यांच्या सोबत त्यांची मुलगी यमुना तिथ वास्तव्यास असते. कथेत आणखी एक पात्र आहे. ज्याचं नाव कोगा आहे. कोगा हा खालच्या जातीतील आहे. वेद-पुराणाची कोगाला काही समज नाहीय. त्यामुळे त्याला आचार्य उड़ुप पंडित यांच्याकडून वेद पुराण शिकायचं आहे. हे शिकण्याचं कारणं काय तर मोक्ष प्राप्ती. एक दिवस आचार्य शहरात जातात परत येताच सगळ बदललेलं असतं. ते पाहतात की, सगळं गाव आचार्यांच्या मुलीचा बहिष्कार करत आहे. या परिस्थितीला आचार्य कसं तोड देतात हे चित्रपट पाहिल्यावरचं समजतं. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT