मनोरंजन

ऑस्कर नामांकन मिळालेली भारताची ‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंटरी नेमकी आहे काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

94 व्या अकादमी पुरस्कारांची अर्थात ऑस्करची नामांकने जाहीर झाली आहेत. यात 'रायटिंग विथ फायर' या भारतीय डॉक्युमेंटरीलाही नामांकन मिळाले आहे. या वर्षी नामांकन मिळालेली ही एकमेव भारतीय फिल्म आहे. रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. या कॅटेगरीत असेंशन, एटिका, फ्ली आणि समर ऑफ द सोल या इतर डॉक्युमेंटरींसी 'रायटिंग विथ फायर'ची स्पर्धा होणार आहे.

दलित महिलांना चालवलेल्या 'खबर लहरिया' या वर्तमानपत्रावर या माहितीपटातून प्रकाश टाकलेला आहे. 2002 मध्ये दिल्लीतील एका एनजीओने बुंदेलखंडच्या चित्रकूट भागात या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. अमेरिकेतील 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रानेही या माहितीपटाचा उल्लेख प्रेरक पत्रकारिता असा केला आहे.

सनडास्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये या माहितीपटाचा प्रीमियर झाला होता. यात स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डसह द ऑडियन्स अ‍ॅवॉर्ड या माहितीपटाने पटकावला होता. याशिवाय 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही या डॉक्युमेंटरीला मिळालेले आहेत. दरम्यान, ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीतून 'जय भीम' आणि 'मरक्‍कर' हे भारतीय चित्रपट बाहेर पडले.

SCROLL FOR NEXT