मनोरंजन

‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचावर भाग्यश्री टिकलेचे कमबॅक!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; छोट्या पडद्यावरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार वळणावर येवून ठेपला आहे. या शोमध्‍ये विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर चाहत्यांना पाहायला मिळत आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढत चालला आहे. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचं होतं परिक्षकांच्या आवडीचं गाणं! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख पेलले आहे. भाग्यश्री टिकले हिला परिक्षकांनी 'जिवलगा' हे अतिशय अवघड गाणी दिले होत आणि या गाण्याला तिने पुरेपूर न्याय देऊन यश मिळविलं आहे.

स्वतःच्या आवडीचं गाणं निवडून ते सादर करणं तसं सोप्प असतं; पण जेव्हा परीक्षक गाणं देतात, तेव्हा त्या गाण्याला पूर्णपणे न्याय देणं, परीक्षकांच्या अपेक्षांना खरं उतरणं हे जबाबदारीचं काम असतं. गेले अनेक आठवड्यात भाग्यश्रीचे परिक्षांकडून विशेष कौतुक झाले होते. पण यंदाच्या आठवड्यात मात्र, भाग्यश्रीने 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दमदार सादरीकरण करून चाहत्यांच्या कौतुकावर स्वतःचं नाव कोरलं.

भाग्यश्री आता हा मिळालेला सूर असाच जपणार का? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'इंडियन आयडल मराठी' सोम.-बुध.,रात्री ९ वाजता चाहत्याच्या भेटीस येत असतो.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT