मनोरंजन

इलियाना डिक्रूजचे हॉट बिकिनीत अंडरवॉटर फोटोशूट

Pudhari News

 पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी इलियाना डिक्रूज एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनय करणारी कलाकार आहे. इलियानाने हिंदीसोबतचं तेलुगु चित्रपट इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. इलियाना सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात नेहमीचं असते. आपले खास फोटोजही ती शेअर करत असते. आता तिने समुद्र असलेल्या एका ठिकाणी भेट दिली आहे. येथे ती क्वालिटी टाईम स्पेन्ड करताना दिसते. एकापेक्षा एक असे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल, 'व्वा! क्या बात है.' 

इलियानाने फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ग्रीन-स्काय ब्ल्यू कलरची हॉट बिकिनी परिधान केली आहे. समुद्राखाली तिचा हा अंडरवॉटर फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. विविध ड्रेसमध्ये तिने हे फोटोज काढले आहेत. निसर्गाचा एक व्हिडिओ तिने कॅमेराबध्द करून चाहत्यांसाठी शेअरही केला आहे. पण, हे निसर्गरम्य ठिकाण कोणते आहे, हे तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलेले नाही. २२ एप्रिल 'अर्थ डे' (EARTH DAY) च्या निमित्ताने हे फोटोज अपलोड केले असून त्याला जगाचा नकाशा असणारी पृथ्वीची इमोजी देखील दिली आहे. अप्रत्यक्षात तिने  अर्थ डे च्या शुभेच्छा देत हे फोटो शेअर केले आहेत.  इलियानाचे समुद्रकिनाऱ्यावरील खूप अधिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात. 

इलियानाने पोकीरी (२००६), जलासा (२००८), किक (२००९), जुलीय (२०१२) असे यशस्वी तेलुगु चित्रपट केले आहेत. इलियाना डिक्रूजने आपल्या करिअरची शुरुआत मॉडलिंगने केली.  इलियानाला पहिला ब्रेक २००६ मध्ये तेलगु चित्रपट देवदासुमधून मिळाला. इलियानाला या चित्रपटासाठी दक्षिणेचा बेस्ट फिमेल डेब्यू ॲवॉर्ड फिल्मफेयर ॲवॉर्ड मिळाला आहे. 

इलियानाचा दुसरा चित्रपट तेलगु सुपरस्टार महेश बाबूसोबत रिलीज झाला. दक्षिणेच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये इलियानाचं नाव घेतलं जातं. इलियानाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक चित्रपट बर्फीतून मिळाला होता.

SCROLL FOR NEXT