अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ आसिफ कुरेशी यांची का दिल्लीत हत्या करण्यात आली आहे. आसिफ हा हुमाचा चुलत भाऊ असल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन या परिसरात आसिफची हत्या केली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन व्यक्तिना ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे. (Entertainment News Update)
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. आसिफने आपल्या घरासमोर वाहन पार्क करू नये असे शेजाऱ्यांना सांगितले.
याचा राग येऊन शेजारील दोन व्यक्तींनी पोकर सारख्या हत्याराने आसिफवर वार केला. छातीवरील वार वर्मी बसल्याने आसिफचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी उज्ज्वल (वय 19) आणि गौतम (वय 18) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही आसिफच्या घरापासून काहीच अंतरावर राहतात.
आसिफचा चिकनचा व्यवसाय आहे. त्याच्या दोन पत्नी आहे. गुरुवारी रात्री जे घडले त्याबाबत बोलताना त्याची एक पत्नी शाहीन म्हणते, रात्री 9.30 - 10 च्या दरम्यान एका शेजाऱ्याने आमच्या घरच्या अगदीसमोर स्कूटर पार्क केली होती. माझ्या पतीने त्याला हटकताच काही वेळाने तो व्यक्ति भावाला घेऊन आला. त्याने शिवीगाळ सुरू केली. आणि आसिफवर धारदार शस्त्राने वार केले. मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला फोन केला. यानंतर आम्ही सर्वजण आसिफला घेऊन हॉस्पिटलला गेलो. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अतिरिक्त रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
झाल्या प्रकाराबाबत अभिनेत्री हुमा कुरेशी आणि तिचा सख्खा भाऊ अभिनेता साकीब सलीम यांच्या दोघांचीही प्रतिक्रिया आली नाही. या बहीण भावाची जोडी आता द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये रक्षाबंधन स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार आहे. हुमा आगामी जॉली एल एलबी 3, गुलाबी आणि बयान या सिनेमात दिसणार आहे.