मनोरंजन

Hugh Hudson Death: ‘चॅरियट्स ऑफ फायर’चे दिग्दर्शक ह्यूग हडसन यांचे निधन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ह्यूग हडसन यांनी १९८१ मध्ये 'चॅरियट्स ऑफ फायर' चित्रपट आणला होता. ज्यांनी बेस्ट मुव्हीसहित चार ऑस्कर जिंकले होते. ह्यूग यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही जाहिराती आणि डॉक्युमेंट्रीशी केली होती. (Hugh Hudson Death) वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी लंडनच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त हडसन यांच्या कुटुंबीयांनी दिले आहे. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. (Hugh Hudson Death)

या चित्रपटाला मिळाले होते चार ऑस्कर

१९३६ मध्ये लंडनमध्ये जन्मलेले ह्यूग हडसन यांचा Chariots of Fire चित्रपट यशस्वी ठरला होता. यामध्ये दोन ब्रिटिश एथलीटची दमदार कहाणी दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला चार ऑस्कर मिळाले होते. ग्रीक संगीतकार वांजेलिसच्या साउंडट्रॅकसाठीही हा चित्रट ओळखला जातो.

ह्यूग यांच्या निधनावर व्यक्त केलं दु:ख

ब्रिटिश अभिनेते Nigel Havers यांनी Hugh Hudson यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले- 'मी खूप दु:खी आहे की, माझे महान मित्र ह्यूग हडसन, ज्यांना मी ४५ वर्षांहून अधिक काळ ओळखतो, त्यांचे निधन झाले. Chariots Of Fire माझ्या प्रोफेशनल लाईफच्या सर्वात महान अनुभवांपैकी एक होता.'

अनेक चित्रपट केले दिग्दर्शित

ह्यूग हडसन यांनी १९८४ च्या 'ग्रेस्टोक: द लेजेंड ऑफ टार्जन', 'लॉर्ड ऑफ द एप्स' सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होतं. अनेक जाहिराती आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकिंग देखील केले.

SCROLL FOR NEXT