hritik roshan  
मनोरंजन

Fighter Song : “हीर आसमानी”मध्ये वैमानिकांची हृदयस्पर्शी झलक घेऊन आले दीपिका-ऋतिक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ आनंदचा आगामी दिग्दर्शन असलेला "फायटर" रिलीज होण्यासाठी सज्ज असताना या चित्रपटातील हीर आसमानी हे गाणं रिलीज झालं. (Fighter Song) "हीर आसमानी" या त्याच्या नवीन गाण्याद्वारे प्रेक्षकांना हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार आहे. (Fighter Song)

संबंधित बातम्या –

गाण्याच्या निर्मितीबद्दल सिद्धार्थ आनंद म्हणतात, "हीर आसमानी" हे गाणं हवाई दलातील पायलटांच्या जीवनाची एक झलक दाखवून देणार आहे. तुम्ही त्यांना ड्युटीवर – ब्रीफिंग रूममध्ये, प्रशिक्षण सत्रांमध्ये, त्यांच्या मिशनची तयारी करताना पाहता आणि नंतर आणखी एक बाजू आहे ती म्हणजे जेव्हा ते लॉकर रूममध्ये असतात, त्यांच्या डाऊनटाईममध्ये त्यांच्या निवासस्थानाभोवती घुटमळत असतात. बोनफायर्समध्ये गिटार वाजवतात हे सर्व आमच्या फायटरांच्या या वास्तविक जीवनशैलीचे विविध पैलू आहेत आणि तेच यातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

सिद्धार्थ आनंद पुढे म्हणतात "हीर अस्मानी हे हवाई बेस कॅम्प ते काश्मीरपर्यंतच्या खर्‍या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. प्रत्येक पार्श्वभूमी गाण्याचा एक विशिष्ट पैलू दाखवते. हवाई बेसवर आम्ही लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरने शूट केले आहे आणि ते प्रत्येक फ्रेम खास करतात. हॅन्गरवर ब्रीफिंग सीन शूट करणे हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यानंतर आम्ही काश्मीरमध्ये अतिशीत कमी तापमानात शूट केलेले ऑफ-ड्यूटी टीम बाँडिंग सीन होते. काश्मीरमध्ये शूटिंग करण्याचं स्वप्न पूर्ण झाल. एक चित्रपट निर्माता म्हणून मला नेहमीचं इथले सौंदर्य कॅप्चर करायचे होते. संपूर्ण कलाकार आणि क्रू यांना कबड्डी खेळण्यात खूप मजा आली.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी, २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT