सबा आजाद-हृतिक रोशन  Instagram
मनोरंजन

Hrithik Roshan-Saba Azad | हृतिक म्हणतो, हॅपी अॅनिव्हर्सरी पार्टनर !

हृतिक म्हणतो, हॅपी अॅनिव्हर्सरी पार्टनर !

पुढारी वृत्तसेवा

हृतिक रोशन हा कलाविश्वातील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या डान्स आणि अभिनयामुळे स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्याला बॉलीवूडचा 'हैंडसम हंक' ही म्हटले जाते. तो अनेकवेळा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. इतिक सध्या गर्लफ्रेंड सवा आजादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे जोडपे अनेक पार्टी आणि सोहळ्यातही एकत्र दिसत असते, आता हृतिकने सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. दोघांच्या नात्याला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळवारी (१ ऑक्टोबर) हृतिकने सवाबरोबरचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'हॅपी अॅनिव्हर्सरी पार्टनर' असे कॅप्शन दिली असून यामध्ये १.१०. २०२४ अशी तारीखही टाकली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतकेच नाही तर, हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खाननेही त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. सुझन म्हणते की, 'सुंदर फोटो, हॅपी अॅनिव्हर्सरी. गेल्या तीन वर्षांपासून हृतिक आणि सवा नात्यात आहेत. हृतिकने सुझेनशी २००० मध्ये लम्नगाठ बांधली होती; पण १४ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांना रिहान आणि इदान ही दोन मुले आहेत. सध्या सुझेन अर्सलानला डेट करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT