सबा आजाद-हृतिक रोशन नात्यात दुरावा आला?  Instagram
मनोरंजन

Hrithik Roshan-Saba Azad Breakup |ह्रतिक रोशन-सबा आजादचा ब्रेकअप?

ह्रतिक रोशन-सबा आजादचा ब्रेकअप?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडचा हँडसम अभिनेता ह्रतिक रोशन सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आला आहे. सबा आजादसोबत त्याचे रिलेशनशीप सर्वश्रुत झाल्यानंतर आता दोघेही लग्न करणार असल्याचे समोर आले होते. दरम्यान, ह्रतिक आणि सबाचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. सबा ही ह्रतिकपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दरम्यान, ह्रतिक रोशन आणि सबा आजाद यांच्यात ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा कोणत्या कारणामुळे ब्रेकअप झाला हे समोर आलेले नाही.

ह्रतिक रोशन-सबा आजादचा ब्रेकअप?

ह्रतिक रोशन आणि सबा आजादच्या ब्रेकअपच्या वृत्ताने आता चर्चा होत आहे. फॅन्सचे म्हणणे आहे की, ह्रतिक - सबा दीर्घकाळ एकत्र दिसले नाहीत. ते वेगवेगळे स्पॉट झाल्याचेही म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी ह्रतिकला पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकटे पाहण्यात आलं आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या लग्नातदेखील ह्रतिक एकटाच पोहोचला. फराह खान यांच्या आईच्या निधनावेळी तो एकटाच उपस्थित होता.

सबा आजादने ऋतिकसोबत ब्रेकअपचे दिले हिंट

सबा आजादने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपल्या नात्याबद्दल हिंट दिले होते. सबा आजादने पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिने खुलासा केला होता की, ऋतिक रोशनला डेट केल्याने तिच्या प्रोफेशनल लाईफवर परिणाम होत आहे. लोक तिला काम देत नाहीयेत.

सबा आजाद एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि अभिनेत्री आहे. सबाने अनेक मोठ्या इव्हेंटमध्ये आपला दिला आहे. काही काळापासून सबाला आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT