मनोरंजन

क्वीन कंगनाने हिमाचलच्या ‘राजा’चा कसा केला पराभव?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने हिमाचलच्या मंडीतून विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार आणि राजघराण्याचे राजकुमार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून कंगनाने मंडीतून विजय मिळवला. विक्रमादित्यला कंगनाने ७४७५५ मतांनी मात दिली. आणि मंडीत भाजपचा झेंडा फडकवला. या विजयासोबतच मंडीमध्ये सगळीकडून कंगनाला शुभेच्छा मिळत आहेत. कंगनाला सर्वात आधी अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनंदन केले. आपल्या विजयानंतर कंगना रनौत खूप खुश आहे आणि ती म्हणाली, 'समस्त मंडीवासींचा पाठिंबा, प्रेम आणि विश्वासासाठी मनापासून आभार, हा विजय आपल्या सर्वांचा आहे. हा विजय पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा आहे…'

आधी मंडी जिल्हा काँग्रेस पार्टीचा गड मानला जायचा. पण, मागील दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचे समर्थन मिळाले आहे.

अधिक वाचा-

कंगनाने दिले पीएम मोदींना श्रेय

कंगनाने विजय मिळवताच जनतेचे आभार मानले आणि पीएम मोदींना या विजयाचे श्रेय दिले. कारण, कंगना आपली पहिलीच निवडणूक जिंकलीय.

अधिक वाचा-

अनुभव नसाताना कंगनाने गड जिंकला

कंगना रनौतला कोणताही अनुभव नसताना तिने काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली. पण, जयराम ठाकुर यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची तिला साथ मिळाली. ते कंगनासोबत १७ विधानसभा क्षेत्रांतील बहुतांशी गावांमध्ये जनसंवाद साधण्य़ात यशस्वी झाले. कंगनाचे पणजोबा दिवंगत सरजू सिंह त्रिफळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

कोण आहेत प्रिन्स विक्रमादित्य सिंह?

विक्रमादित्य सिंह हे माजी मुख्य़मंत्री वीरभद्र सिंह आणि खासदार प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत. विक्रमादित्य सिंह २०२२ च्या निवडणुकीत शिमला ग्रामीणमधून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. ते हिमाचल प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील आहेत.

कंगना-प्रिन्स विक्रमादित्य यांचे आरोप-प्रत्यारोप

राज्यसभा निवडणुकीवेळी कंगना आणि विक्रमादित्य यांच्यातील वाद सर्वांना माहिती आहे. त्यावेळी विक्रमादित्य यांनी कंगनावर जोरदार टीका केली. निवडणुकीत उतरताच विक्रमादित्य यांनी कंगनाला मंडी मतदारसंघाच्या विकासाबाबत तिचा दृष्टिकोन विचारला होता. शिवाय टीका करत म्हटले होते की, 'कंगना महिनाभराच्या राजकीय दौऱ्यावर असून ४ जूननंतर ती बॅग पॅक करून बॉलीवूडमध्ये परतणार आहे.' त्यावेळी या टीकेला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने विक्रमादित्य यांना हिमाचलचा 'छोटा पप्पू' म्हणत निशाणा साधला होता.

अधिक वाचा-

मंडीचा राजकीय इतिहास

मंडी लोकसभा जागेच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर, येथे बहुतेक राजघराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. येथील झालेल्या १९ निवडणुकांमध्ये ज्यामध्ये २ पोटनिवडणुकांचाही समावेश आहे, त्यामध्ये राजघराण्यातील नेते १३ वेळा निवडून आले आहेत. केवळ ६ वेळा सामान्य कुटुंबातील नेते निवडून आले आहेत. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री अमृत कौर होत्या, ज्या पटियालाच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. आजही येथील खासदार राणी प्रतिभा सिंह आहेत. रामपूर बुशहरचे राजा आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या त्या पत्नी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT