प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीट याच्या घटस्फोटावर तब्बल ८ वर्षांनतर तोडगा निघाला आहे. (Image source- Instagram)
मनोरंजन

अँजेलिना जोली- ब्रॅड पीट यांच्या घटस्फोटावर अखेर ८ वर्षांनंतर तोडगा

Angelina Jolie- Brad Pitt | आठ वर्षांपूर्वी अँजेलिनाने ब्रॅड पीट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी केला होता अर्ज

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि ब्रॅड पीट (Brad Pitt) याच्या घटस्फोटावर तब्बल ८ वर्षांनतर तोडगा निघाला आहे. याबाबतची माहिती अँजेलिनाच्या वकिलाने सोमवारी दिली. यामुळे हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ चाललेला आणि सर्वात वादग्रस्त घटस्फोटांच्या घटनांपैकी एक असलेल्या या खटल्याचा शेवट झाला आहे.

अँजेलिनाचे ॲटर्नी जेम्स सायमन यांनी असोसिएटेड प्रेसकडे बोलताना या वृत्ताला पुष्टी दिली. या जोडप्यामध्ये अखेर तोडगा निघाला आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम पीपल मॅगझिनने दिले होते.

"आठ वर्षांपूर्वी अँजेलिनाने हॉलिवूड अभिनेता पीट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता.” असे सायमन यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. “अँजेलिनाने आणि मुलांनी पीट याच्या सर्व मालमत्ता सोडल्या आहेत. तेव्हापासून तिने तिच्या कुटुंबाला शांततेत राहता यावे आणि मानसिक स्वास्थाकडे लक्ष केंद्रित केले. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दीर्घ प्रक्रियेचा हा केवळ एक भाग आहे. खरे सांगायचे तर, अँजेलिनासाठी हा खूप थकवणारा खटला ठरला. पण आता एक भाग संपल्याने तिला दिलासा मिळाला आहे.”

Angelina Jolie- Brad Pitt : दोघांमध्ये नेमकं काय घडलं होतं?

अँजेलिना जोली (Hollywood actress Angelina Jolie) हिने तिचा एक्स पार्टनर ब्रॅड पीट (Brad Pitt) याच्याविरुद्धचा २०१६ मधील घटनेशी संबंधित खटला याआधी मागे घेतला होता. हा तोच खटला आहे; ज्यानंतर अँजेलिनाने ब्रॅड पीट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. दोघांमध्ये विमानात जोरदार भांडण झाले होते. विमानात त्यावेळी जे काही झाले; तोच त्यांच्या नात्याचा शेवट होता, असे अँजेलिनाने त्यावेळी म्हटले होते. कथित विमानातील वादाच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे जारी केल्याबद्दल न्याय विभाग आणि एफबीआयमधील खटला मागे घेतला होता. हा वाद अँजेलिना आणि तिचा एक्स पार्टनर ब्रॅड पीट यांच्यात झाला होता. आता घटस्फोटाच्या खटल्यावर तोडगा निघाल्याने दोघांमधील न्यायालयीन लढाई संपली आहे.

अँजेलिनाने तक्रारीत म्हटले होते की, ''एक्स पती ब्रॅड पीटने विमानात तिच्यावर आणि तिच्या मुलांना कथितरित्या मारहाण केली. तसेच जोरदार शाब्दिक वाद झाला होता. यामुळे त्यांच्यावर शारिरीक आणि मानसिक आघात झाला." नंतर, या आरोपांना एफबीआयच्या रिपोर्टमधून (FBI report) पुष्टी मिळाली; ज्यात अँजेलिनाने ब्रॅड पीट याच्यावर १४ सप्टेंबर २०१६ रोजी युरोपहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात तिच्यावर आणि तिच्या एका मुलावर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पीट याच्यावर कोणतेही आरोप लावण्यात आले नाहीत. त्याने गैरवर्तन केल्याचा आरोपही फेटाळून लावला होता. तिने १९ सप्टेंबर २०१६ रोजी ब्रॅड पीट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अँजेलिना ही जगातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाते. ती हॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT