वॅल किल्मर यांचे निधन  Instagram
मनोरंजन

'टॉप गन', 'बॅटमॅन' फेम वॅल किल्मर काळाच्या पडद्याआड

Hollywood Actor Val Kilmer Passed Away | 'टॉप गन', 'बॅटमॅन' सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे वॅल किल्मर यांचे निधन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना निमोनिया झाला होता. त्यांच्या निधनाची पुष्टी मुलगी मर्सिडीज किल्मरने केली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीजने असोसिएटेड प्रेसला पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगितलं की, किल्मर यांचे मंगळवार १ एप्रिलच्या रात्री लॉस एंजिल्समध्ये निधन झाले.

१९८४ मध्ये सुरु केलं करिअर

वॅल किल्मर यांचे निधन निमोनिया झाले. २०१४ मध्ये त्यांना गळ्याच्या कॅन्सरचे निदान झाले होते. उपचारानंतर ते ठिक झाले होते. वॅल किल्मरने आपल्या करिअरची सुरुवात १९८४ मध्ये 'टॉप सीक्रेट'मधून केली होती. त्यांनी 'टॉप गन', 'रियल जीनियस', 'विलो', 'हीट' आणि 'द सेंट' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

'टॉप गन' मध्ये आईसमॅनची भूमिका साकारणारे 'बॅटमॅन फॉरएवर' मध्ये बॅटमॅनच्या रूपात दिसले होते. 'द डोर्स'मध्ये जिम मॉरिसनच्या भूमिकेत होते. २०२१ मध्ये आपल्या करियरवर आधारित डॉक्युमेंट्री 'वॅल'च्या शेवटात म्हटलं होतं- 'मी खराब व्यवहार केला आहे. मी धाडसाने व्यवहार केला आहे. मी काही लोकांच्या सोबत विचित्र व्यवहार केला आहे. मी यापैकी कोणतीही गोष्ट नाकारत नाही. मला कोणताही पश्चाताप नाही. कारण मी स्वत:चे काही हिस्से, गोष्टी गमावल्या आहेत. ज्यबद्दल मला काहीही माहिती नव्हतं'.

२०२२ मध्ये आलेला त्यांचा 'टॉप गन: मेवरिक' चित्रपट अखेरचा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT