होळीच्या औचित्याने विविध चित्रपट ओटीटीवर पाहता येणार Instagram
मनोरंजन

मार्चमध्ये होळीच्या रंगांसोबत मराठी मनोरंजनाची मेजवानी

Holi Special Movies | नवनवी रंगत ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्च महिन्यात होळीच्या रंगांसोबत तुमच्या मनोरंजनाच्या रंगात सुद्धा भर घालायला येत आहे अल्ट्रा झकास मराठी ओटीटी. एकापेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पाहता येणार आहे. मराठी भाषेतील नवे कोरे सिनेमे, वेब सीरीज आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट मराठीत डबमध्ये आता तुम्हाला पाहता येणार आहेत.

‘राख’ - गुन्हेगारी, राजकारण आणि सत्याचा खेळ!

वेब सीरीज ‘राख’ ही एक क्राईम, थ्रिलर वेब सीरीज आहे. ही सीरीज २८ मार्च २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे दिग्दर्शन राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केले आहे. जिथे न्याय हा केवळ सत्ताधाऱ्यांचा खेळ असतो. या कहाणीत एका हत्येचा तपास फसवणूक, राजकीय कटकारस्थानं आणि सूडाच्या चक्रव्यूहात अडकलेला दाखवण्यात आलेला आहे. शिवाय या वेब सीरीजमध्ये अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दास्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण, कृष्ण रघुवंशी यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

Locked - ( लॉक्ड ) - एका बंदिस्त वाड्याचं गूढ रहस्य

‘लॉक्ड’ ही एक तेलुगू क्राईम थ्रिलर वेब सीरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रदीप देवा कुमार यांनी केले असून ही वेब काही अनोळखी लोकांची आहे. ज्यात एक व्यक्ती आपली ओळख घेऊन फिरतो आणि त्यापैकी दोन चोर आणि काही दुर्दैवी लोकं. त्या सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर यायचं असतं पण येण्याचा कोणताच मार्ग सापडत नसतो आणि परिस्थिती दिवसेंदिवस बेताची होऊन जाते. पण त्यापैकी एक मास्टरमाईंड पुढे येतो आणि सर्व बदलून जातं. सीरीज १४ मार्च २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. ही कथा एका मोठ्या वाड्यात अडकलेल्या थरारक प्रवासातून कोणाची सुटका होणार? की या वाड्याचे गूढ कायम त्यांना आपल्यासोबत ठेवणार आहे.

टोपीवाले कावळे - राजकीय व्यवस्थेवर तिखट व्यंग आणि धमाल विनोदाची कमाल

‘टोपीवाले कावळे’ हा एक मराठी राजकीय विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे, जो महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा निर्धार करणाऱ्या काही सामान्य लोकांच्या संघर्षाची कहाणी सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. या चित्रपटात प्रचार मोहिमेतील अडथळे आणि जनतेचे समर्थन जिंकण्यासाठी वापरलेल्या युक्त्या विनोदी शैलीत सुरेखपणे दाखवण्यात आलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT