मनोरंजन

‘हिरा फेरी’ लवकरच! अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत बहर आणणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बोल हरी बोल' या सुपरहिट चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला घेऊन दिग्दर्शक अमोल बिडकर 'हिरा फेरी' करण्याच्या तयारीत आहेत. 'हिरा फेरी' या चित्रपटात कॉमेडी क्वीन अर्थात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि 'बॉईज २' फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार.

त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडी स्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT