हिंदी अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे १०० व्या वर्षी निधन  Smriti Biswas
मनोरंजन

हिंदी अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे १०० व्या वर्षी निधन

हिंदी अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे १०० व्या वर्षी निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे निधन झाले आहे. त्या १०० वर्षांच्या होत्या. वयाच्या संबंधित आजारांनी त्या त्रस्त होत्या. गुरुवारी ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री स्मृती विश्वास यांनी नुकतेच १७ फेब्रुवारी रोजी १०० वा वाढदिवसा साजरा केला होता. दरम्यान वयाच्या संबंधित आजारांनी त्या डॉक्टारांच्या देखरेखी खाली होत्या. ४ जुलै रोजी त्याचे दु: ख निधन झाले. ही माहिती सोशल मीडियावर पसरताच अनेक बंगाली आणि बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्मृती विश्वास यांचे करिअर

स्मृती विश्वास यांनी वयाच्या १० व्या वर्षी बंगाली चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'संध्या' या बंगाली चित्रपटातील 'शोबिझ'च्या भुमिकेने त्या प्रकाश झोतात आल्या. बंगाली चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातही काम केलं आहे. १९३० ते १९६० च्या दशकात त्या इंडस्ट्रीत खूप सक्रिय होत्या.

दिग्गजांसोबत साकारला अभिनय

संध्या, रागिणी, नेक दिल, कैसे भुलू, मुक्ती, चितेगाव, अपराजिता, अभिमान, अनुराग, जबान बंदी, सुहान, आरजू, हमसफर, हमदर्द, बाप रे बाप, भागम भाग, डाका, मर्यादा, ताज, तलवार, शहीद-ए-आझाद भगतसिंग, एक औरत, नाय भाभी, अरब का सौदागर, याहुदी की लडकी, दिल्ली का ठग, चांदणी चौक, नील आकाशर नेचे, मॉडर्न गर्ल (1961) यासारख्या चित्रपटात स्मृती यांनी अभिनयाचा ठसा उमठवलाय. कलाकार देव आनंद, किशोर कुमार, राज कपूर आणि निर्माते गुरुदत्त, व्ही शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा याच्यासोबत काम केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT