हिना खानचा पहिल्या किमोथेरपीचा फोटो समोर Hina Khan Instagram
मनोरंजन

किमोथेरपीचा पहिला फोटो शेअर; हिना खानवर उपचार सुरु

ब्रेस्ट कॅन्सरवर किमोथेरपी सुरु; हिना खानचा पहिला फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिने स्वत: ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सोशल मीडियावर सेलेब्स आणि तिचे फॅन्स तिला हिंमत देत आहेत. ती लवकर ठिक व्हावी, अशी अपेक्षा करत आहेत. दरम्यान, हिना खानने आपली पहिली किमोथेरेपी ट्रीटमेंटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आतम्विश्वासाने हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसतेय.

निदान झाल्यानंतर हिंमत हारली नाही : हिना खान

हिनाने सांगितले की, जेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले. तेव्हा लगेच तिने ॲवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली. इन्स्टाग्रामवर ॲवॉर्ड नाईट ते किमोथेरेपी साठी हॉस्पिटल बेडवर बसलेल्या हिनाने सर्व अपडेट शेअर केली आहे.

सोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “या ॲवॉर्ड नाईटमध्ये, मला कॅन्सरविषयी समजलं, पण मी नॉर्मल राहिले. हे केवळ माझ्यासाठी नाही तर आमच्या सर्वांसाठी आहे. तो हा दिवस होता, ज्याने सर्वकाही बदललं, ज्यामुळे माझ्या जीवनाची सर्वात आव्हानात्मक वेळेची सुरुवात झाली.”

काय म्हणाली हिना?

हिनाने पुढे लिहिलं की, “तर चला काही वचन घेऊया. आम्ही तेच बनतो, ज्यावर आपण विश्वास करतो. आणि मी हे आव्हान स्वत:ला पुन्हा मजबूत करण्यासाठी स्वीकारलं आहे. मला हा अनुभव सामान्य बनवायचा आहे..माझं वर्क कमिटमेंट महत्त्वाचं ठरतं. माझ्यासाठी प्रेरणा, आर्ट महत्वाचं ठरतं. मला झुकायचं नहीये. हा पुरस्कार जो मला माझ्या पहिल्या किमोच्या आधी मिळाला...मी स्वत: ला सिद्ध करण्यासाठी या इवेंटमध्ये सहभागी झाले होते. आणि त्या बेंचमार्कवर माझी सत्यता पडताळून पाहिली. मी स्वत: ला स्वत:साठी सिद्ध केलं आहे. ”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT