पुढारी ऑनलाईन डेस्क - यारिया फेम अभिनेता हिमांश कोहलीचे 'मेहंदी सेरेमनी' फोटोनंतर लग्नाचे फोटो समोर आले आहेत. वधू आणि वर वेषात कपलचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने चित्रपट 'यारिया'मधून डेब्यू केलं होतं. आता त्याचे लग्नातील फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत.
हिमांश कोहली पत्नीसोबत लग्नमंडपात पोज देताना दिसत आहेत. हिमांश या फोटोजमध्ये डार्क पिंक शेडची शेरवानी परिधान केलेला दिसतो. त्याने रेड कलरची पगडी घातली आहे.
तर त्याची पत्नी गोल्डन आणि पिंक कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिने माथा पट्टी, गोल्ड नेकलेस आणि मॅचिंग बांगड्या असा तिचा लूक दिसतो आहे. हिमांश कोहलीने खूप सिंपल वेडिंग केले आहे. आपल्या फॅमिलीच्या उपस्थितीत मंदिरात त्याने सात फेरे घेतले.
हिमांशच्या लग्नाचे हे फोटोज पाहून फॅन्स कपलला शुभेच्छा आणि अभिनंदन करत आहेत. हिमांशने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केली. ज्यामध्ये तो नवरदेव बनताना दिसत आहे. त्यानंतर तो डान्स करतानाही दिसतो आहे. यावेळी लग्नाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. पण, त्याची पत्नी कोण आहे, काय करते? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.