अम्ब्रेला चित्रपट 
मनोरंजन

Hemal Ingale : हेमल इंगळेचा नवा चित्रपट ‘अम्ब्रेला’, पोस्टर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधरत 'अम्ब्रेला' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. मनोज विशे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हेमल इंगळे, अभिषेक सेठीया मुख्य भूमिकेत आहेत. अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

स्वरनाद क्रिएशन आणि ब्ल्यू अम्ब्रेला एन्टरटेन्मेंटची निर्मिती आहे. सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुती असलेला 'अम्ब्रेला' २०२३ मध्ये रिलीज होईल.

मनोज विशे आणि अरविंद सिंग राजपूत 'अम्ब्रेला'चे निर्माते आहेत. अविराज दापोडीकर, सचिंद्र शर्मा, सार्थक अधिकारी, आशिष ठाकरे आणि निलेश पाटील सहनिर्माते आहेत. 'अम्ब्रेला' ही एका सुशिक्षित, कुटुंबाभिमुख जोडप्याची हळुवार, संगीतमय प्रेमकथा आहे ज्यांच्या प्रेमामुळे दोन कुटुंबातील नातेसंबंधात भावनिक दुरवस्था होते. पालकांच्या असलेल्या अपेक्षांमुळे मुलांच्या भावविश्वात उलथापालथ होते.

'अम्ब्रेला'च्या दिग्दर्शकाविषयी बोलताना मनोज विशे म्हणाले की, चित्रपट बघतांना चित्रपटातील पात्र आपल्याच घरातील , गावातील असल्याचा आपल्याला भास होईल, पाटील संस्कृतीत वाढलेल्या प्रेमी युगुलांचा संगीतमय प्रेमप्रवास आपल्याला ह्या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. 'अम्ब्रेला'चे मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

गीतकार मंगेश कांगणे यांनी 'अम्ब्रेला'साठी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार संतोष मुळेकर यांनी अजय गोगावले, दिवंगत के.के., सुनिधी चौहान, नकाश अझीझ, आनंद शिंदे आणि भारती मढवी या गायकांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT