हेमा मालिनी यांनी एक्सवर आपल्या कौटुंबिक फोटो अल्बममधील दुर्मीळ क्षण शेअर करत भावनिक पोस्ट केली. "फोटोंचा मोठा संग्रह आहे.." असे त्यांनी म्हटले. पती धर्मेंद्र, मुली आणि जुन्या आठवणींनी भरलेल्या या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आनंद व नॉस्टॅल्जिया निर्माण झाला आहे.
Hema Malini Shared Family Album on x account
मुंबई - बॉलिवूडची ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही काळ ट्विटर (X) पासून दूर राहिल्यानंतर त्या पुन्हा ॲक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी एक खास आणि भावूक करणारी पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी कुटुंबीयांच्या आणि आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण टिपणारा फोटो अल्बम चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
एका ट्विटमध्ये फॅमिली फोटो शेअर करताना त्यांनी म्हंटलय-
मला माहित आहे की हे फोटोंचा प्रचंड संग्रह आहे परंतु हे प्रकाशित झालेले नाहीत आणि हे पाहताना माझ्या भावना उलगडत आहेत❤️
आणखी एका लेटेस्ट ट्विटमध्ये त्यांनी महटलंय- काही सुंदर कौटुंबिक क्षण… फक्त मौल्यवान फोटो❤️❤️
त्यांनी या दुर्मिळ आणि जुन्या फोटोंची झलक दाखवली. या फोटोंमध्ये त्यांच्या कुटुंबातील खास क्षण, जुन्या आठवणी, सिनेसृष्टीतील प्रवासातील प्रसंग आणि काही अगदी वैयक्तिक क्षणांचाही समावेश आहे. हे फोटो पाहताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया सुरू झाले आहेत.
धर्मेंद्र आणि त्यांच्या मुली ईशा देओल आणि अहाना देओल यांच्यासोबतचे तिचे दुर्मीळ फोटो पोस्ट करत त्यांनी फोटो व्हायरल केले आहेत. हेमा मालिनी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करत असतात.
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. चित्रपट विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी विवाह केला होता. त्यांना मुलेही होती. पण, १९८० मध्ये त्यांनी हेमा मालिनीशी विवाह केला. त्यांना दोन मुली इशा, अहाना झाल्या.
धर्मेंद्र यांच्याशी हेमा मालिनी यांची कशी झाली होती भेट?
मीडिया रिपोर्टनुसार, ''एका मुलाखतीत जेव्हा हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांची पहिली भेट कशी झाली होती.
यावर त्यांनी सांगितलं की- पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना पाहिलं..त्याआधी मी इतका हँडसम मॅन पाहिला नव्हता. ते खूप चांगले दिसायचे. मी इम्प्रेस झाले होते. पण याचा अर्थ असा नाही की, मला त्यांच्याशी लग्न करायचे होते. जेव्हा मी त्यांचे फॅन झाले होते. पण, त्यांनी माझ्याशी लग्नासाठी प्रयत्न केले होते. ते देखील माझ्यावर प्रेम करायचे. पण एक वेळ अशी आली की, मी त्यांना म्हणाले की, मला तुमच्याशी लग्न करावेच लागेल. तुम्ही असे नाही सोडू शकत. मला माहिती होतं की, विवाहित धर्मेंद्र यांच्याशी लग्न करणे कठीण होते. पण प्रेमाविषयी आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीची मी अपेक्षा केली नव्हती. ते माझ्यासोबत नहमी होते. त्यामुळे संपत्ती वा आणखी काही नको होतं. मला केवळ प्रेम हवं होतं.''