हार्दिक पांड्या सध्या त्याच्या नव्या रेकॉर्डमुळे नाही तर नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. हार्दिक सध्या माहिका शर्माला डेट करतो आहे. पत्नी नतासा स्टनकोव्हीकला घटस्फोट दिल्यानंतरही त्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत जोडले गेले होते. पाहुयात आतापर्यंत हार्दिकने कोणाकोणाला डेट केले आहे.
2016 मध्ये हार्दिक अँड लिशा एकमेकांना डेट करत होते. लिशा मॉडेल आहे.
लिशासोबतच्या अफेयरनंतर हार्दिकचे नाव एलि अवरामसोबत जोडले गेले होते. 2017 मध्ये तो तिच्यासोबत नात्यात होता
यामध्ये इशा गुप्ताचेही नाव होते. पण इशाने या बातमीचे खंडन केले. त्यानंतर उर्वशी रौतेलासोबत हार्दिकचे नाव जोडले गेले. पण उर्वशीने याला फक्त मैत्री असे नाव दिले
परिणीती चोप्रा आणि हार्दिकचे नाव एका गैरसमजातून जोडले गेले होते. पण हा केवळ गैरसमज असल्याचे समोर आले.