Hardik Pandya gifts son agastya car  instagram
मनोरंजन

Hardik Pandya gifts son car | हार्दिकचं पुत्र प्रेम! अगस्त्यला गिफ्ट केली तब्बल ४ कोटींची कार! एक्स वाईफ नताशाची अशी प्रतिक्रिया

Hardik Pandya gifts son car | हार्दिक पांड्याचं पुत्र प्रेम! अगस्त्यला गिफ्ट केली तब्बल ४ कोटींची कार, एक्स वाईफ नताशा स्टेनकोविकची अशी होती प्रतिक्रिया

स्वालिया न. शिकलगार

भारतीय क्रिकेट स्टार हार्दिक पांड्याने आपल्या मुलगा अगस्त्यासाठी तब्बल ४ कोटी रुपयांची लक्झरी कार गिफ्ट केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलावर असलेले प्रेम व्यक्त करत हार्दिकने ही खास भेट दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, एक्स वाईफ नताशा स्टॅनकोविच हिनेही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.

Hardik Pandya gifts son agastya a car worth 4 cr

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नशाता हे वेगळे झाले असले तरी हार्दिकचं आपल्या मुलाप्रती असलेलं प्रेम अद्यापही कायम आहे. त्याने आपला मुलगा अगस्त्यला तब्बल ४ कोटींची कार भेट दिलीय. नताशा स्टेनकोविक आपल्या मुलांचा सांभाळ करते. दरम्यान, हार्दिकने आपल्या मुलासाठी (अगस्त्य) हे महाग गिफ्ट दिले आहे. आपले बिझी शेड्यूल असूनही आपल्या मुलाच्या आनंदासाठी त्याने कार गिफ्ट केली.

त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. आपल्या मुलासोबत नताशाने कारची डिलिव्हरी स्वीकारली. हार्दिकने SUV Land Rover Defender कार गिफ्ट केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारची किंमत तब्बल ४ कोटी सांगितली जात आहे. सोशल मीडियावर या खास क्षणांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये नताशा आपल्या मुलासोबत कार समोर उभी असलेली दिसत होती.

व्हायरल फोटो आणि व्हिडिओमध्ये ब्लॅक कलरच्या या लक्झरी कार जवळ एक पोस्टर दिसत आहे. ज्यावर लिहिलेलं दिसतं- “पापाकडून अगस्त्यसाठी.” हार्दिकचा हा अंदाज फॅन्सना खूपच आवडत आहे. सोशल मीडियावर नेटकरी हार्दिकचे कौतुक करतानाही दिसत आहेत.

घटस्फोटनंतरही पुत्रप्रेम

हार्दिक पांड्या-नताशा स्टेनकोविकने जुलै २०२४ मध्ये आपल्या घटस्फोटाची घोषणा केली होती. लग्नाच्या चार वर्षानंतर हे कपल वेगळे झाले होते. वेगळे झाल्यानंतरही दोघेजण आपल्या मुलाची जबाबदारी निभावत आहे.

हार्दिक गर्लफ्रेंडमुळे चर्चेत

हार्दिक मॉडल माहिका शर्मासोबत डेटिंगमुळे देखील चर्चेत आहे. टी २० वर्ल्ड कप मॅच दरम्यान त्याने माहिकाचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला होता. त्याने सरप्राईज बर्थडे पार्टी देखील ठेवली होती. पुष्पगुच्छ देऊन त्याने शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

२५ वर्षांची माहिका एक मॉडल आहे. तिने मिस टीन नॉर्थईस्टचा किताब आपल्या नावे केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT