Happy Birthday Saif Ali Khan net worth details
मुंबई - चित्रपट जगतातील श्रीमंत कलाकारांच्या यादीत सैफ अली खानचे नाव घेतले जाते. अभिनयाचा वारसा लाभलेला अभिनेता सैफच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर केवळ बंगले, गाड्याच नाही तर त्याचे इतर कमाईचे स्त्रोत आहेत. ज्यामधून तो कोटींची कमाई करतो. इतकेच नाही तर त्याच्याकडे स्वत:ची प्रोडक्शन कंपनी आहे, ज्यामधून चित्रपट निर्मिती होते, जी एक कमाईचा स्त्रोत आहे.
रिपोर्टनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत, सैफ अली खानची एकूण संपत्ती जवळपास १,२०० कोटींच्या जवळपास आहे. सैफ अली खानकडे दोन प्रोडक्शन बॅनर आहेत- इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाईट फिल्म्स. या प्रोडक्शन बॅनर अंतर्गत अनेक यशस्वी प्रोजेक्ट्स देखील बनवण्यात आले आहेत.
सैफ चित्रपटातून चांगली कमाई करतो. अनेक जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूकीतून तो चांगली कमाई करतो. तो एका चित्रपटासाठी १०-१५ कोटी रु. कमावतो.
हरियाणातील गुरुग्राममध्ये वडिलोपार्जित पतौडी पॅलेस आहे. ज्याची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे. या हवेलीला 'इब्राहिम कोठी' नावाने देखील ओळखले जाते, जे १० एकरमध्ये आहे. पतौडी पॅलेसमध्ये अनेक बॉलीवूड - हॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
सैफकडे बांद्रामध्ये दोन घरे आहेत. एका अपार्टमेंट्चे नाव सतगुरु शरण अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत १०३ कोटी रुपये सांगितली जाते. दुसरीकडे बॉलीवूड स्टार सैफ त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर आणि मुलांसमवेत मुंबईतील बांद्रामध्ये एका आलीशान घरात राहतो. खान फॅमिली २०२१ मध्ये फॉर्च्यून हाईट्समध्ये आपले घर सोडून या घरात शिफ्ट झाले होते. शिवाय, स्विट्जरलँडच्या गस्ताद (Gstaad) लक्झरी हाऊस असल्याचे सांगितले जाते, त्याची किंमत ३३ कोटी रुपये आहे.
गुंतवणूक
विविध व्यवसाय आणि रियल इस्टेटमध्ये तो गुंतवणूक करतो
त्याच्याकडे हाऊस ऑफ पटौदी नावाने एक फॅशन ब्रँड देखील आहे. तो एका रेस्टॉरंटचा मालक देखील आहे.
सैफकडे अनेक लक्झरी कार्स आहेत, ज्यामध्ये ऑडी आर8, लँड रोवर डिफेंडर, रेंज रोवर वोग, मर्सिडीज-बेंज एस-क्लास (एस450), फोर्ड मस्टँग जीटी, जीप ग्रँड चेरोकी ट्रेलहॉकचा समावेश आहे.