पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे प्रसिध्द कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही सर्वांचीच फेव्हरेट जोडी आहे. तुम्हाला माहिती आहे का, दीपिकाने रणवीरसोबत मैत्री करण्यापूर्वी एक अट घातली होती. कारण, दीपिकाला प्रेमात अनेकदा धोके मिळाले होते. त्यामुळे तिला रिलेशनशिपमध्ये यायचं नव्हतं. रणवीर आणि दीपिकाने चित्रपट 'गोलियों की रासलीला-रामलीला' केला. या चित्रटावेळीचं दोघे जवळ आले आणि त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. आज रणवीर सिंहचा वाढदिवस आहे. त्या औचित्याने या दोघांविषयी जाणून घेऊया,
इटलीमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर, २०१८ रोजी दीपिका आणि रणवीर सिंह विवाहबंधनात अडकले. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. परंतु, दोघांनी उघडपणे आपले नाते कबुल केले नव्हते. पण, दीपिकाचे आई- वडील मुंबईमध्ये रणवीरच्या घरी आल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि दोघांची लव्हस्टोरी सर्वांसमोर आली.
लीला राम-लीला'मध्ये काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मध्यंतरी, दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. रणवीर सिंह दीपिकाने परिधान केलेल्या घागरा चोळीकडे एकटक पाहत असल्याचा हा फोटो होता. अभिनेते गुलशन देवैया यांनी या चित्रपटात दीपिकाच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? हे त्यांनी सांगितले होते.
गुलशन देवैया यांनी सांगितले होते की, 'गोलियों की रासलीला राम-लीलाच्या की शूटिंगवेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. पहिल्या दिवसांपासून त्यांच्यामध्ये चांगली बॉन्डींग झाली होती. यानंतर दीपिकाने रणवीरसोबत बाजीराव मस्तानी चित्रपट केला.'पद्मावत' चित्रपटावेळीही दोघेही एकत्र होते. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह खलनायकाच्या भूमिकेत होता.
फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत दीपिका पादुकोणने सांगितलं की, जेव्हा ती रणवीरला भेटली होती, तेव्हा तिला कुणावरचं विश्वास नव्हता. त्यावेळी दीपिकाला रणवीर सिंह आवडत होता. पण, ती रिलेशनशिपमध्ये राहू शकत नव्हती. कारण, मागील रिलेशनशीपमध्ये तिचा विश्वास तुटला होता. दीपिकाने सांगितलं होतं की, रणवीर सिंहला भेटल्यानंतर सांगितले होते की, रिलेशनशिपऐवजी तिल कॅज्युअल डेटिंग करायचं आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितलं की, तेव्हा आयुष्यात असं जवळ कुणीचं नव्हतं. कुणाशीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. मुलाखतीत, त्याने म्हटलं होतं की, आयुष्यात तुम्हाला असे अनेकदा वाटते की, आपल्याला साथ देणारा व्यक्ती नेहमी आपल्यासोबत असायला हवा. रणवीरचं म्हणणं होतं की, आता त्याला फॅमिली मॅन व्हायचं होते, आणि त्याला मुले आवडायची.
जेव्हा राम लीलाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा रणवीर आणि दीपिका यांना एकमेकांशी प्रेम झालं. या सेटवरचा एक किस्सा असाही सांगितला जातो की, जेव्हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी कट म्हणाले, तरीही रणवीर-दीपिका एकमेकांना किस करत राहिले होते. सर्वजण शांत, कुठलाही क्रू मेंबर काहीचं बोलत नव्हता. इतकेचं नाही तर राम-लीलाच्या एक क्रू मेंबरने सांगितलं होतं की, शूटिंगनंतर दोघे एकमेकांना बेबी म्हणून बोलवत होते. दोघांनाही आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सर्वाधिक वेळ घालवणं आवडायचं. या चित्रपटातील 'अंग लगा दे' गाण्यानंतर दोघांनीही आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.