Happy Birthday Nushrratt Bharuccha
मुंबई : घरच्या मंडळींना कोणतीही कल्पना न देता अभिनेत्री नुसरत भरूचाने हिट चित्रपट ‘लव सेक्स और धोखा’ शूट केलं होतं. आज १७ मे रोजी तिचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा चित्रपट ‘लव सेक्स और धोखा’ विषयी जाणून घेऊया या खास गोष्टी.
नुसरत भरूचाचा जन्म १७ मे, १९८५ रोजी मुंबईतील एका दाऊदी बोहरा परिवारात झाला होता. ती एकुलती एक असून वडील तनवीर भरूचा बिझनेसमॅन आहेत आईचे नाव तसनीम भरूचा आहे.
तिचा आणखी एक चित्रपट प्यार का पंचनामाची देखील खूप चर्चा झाली होती. पण तिच्या करिअरबद्दल घरच्यांना तिने सांगितले नव्हते. नुसरत भरूचाच्या ॲक्टिंग करिअरमध्ये एक ट्विस्ट होतं. तिने जेव्हा एक चित्रपट केला तेव्हा आपल्या आई-वडिलांना याबद्दल सांगितले नव्हते.
नुसरतने छोरी, सोनू के टिटू की स्विटी, छोरी २, प्यार का पंचनामा, ड्रिम गर्ल, छलांग, प्यार का पंचनामा २, राम सतू, अकेली, आकाशवाणी अशी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुसरतने करिअरची सुरुवात २००६ मध्ये केली. ‘जय संतोषी मां’ चित्रपाटतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण, खरी ओळख मिळाली ती, २०१० मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘लव सेक्स और धोखा’मधून.
एका पॉडकास्टमध्ये नुसरतने खासगी आणि प्रोफेशनल जीवनाविषयी सांगितलं होतं. त्यामध्ये तिने म्हटलं होतं की, एकदा तिच्या वडिलांचा बिझनेस तोट्यात गेला होता, त्यावेळी आपल्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी तिने नोकरी केली.
नुसरत म्हणाली, “वडिलांना पाहून मी स्वत:च जबाबदार बनले. मी छोटी-मोठी नोकरी करू लागले. मग एक दिवस मला, ॲड फिल्म ऑडिशन देण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून मी पहिला चित्रपट ‘संतोषी मां’ केला. त्यानंतर मी ‘लव सेक्स और धोखा’साठी ऑडिशन दिलं. पण मी रिजेक्ट झाले. मग जी मुलगी माझ्या जागी निवडण्यात आली होती, तिने चित्रपट सुरु होण्याच्या १० दिवस आधीच सोडला. त्यामुळे तो चित्रपट मला मिळाला.”
नुसरतने सांगितलं की, जेव्हा ती ‘लव सेक्स और धोखा’ चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा त्याबद्दल आई-वडिलांना सांगितलं नव्हतं. यमागे एक कारण होतं ते म्हणजे चित्रपटातील किसींग सीन. ती खूप घाबरली होती.