पुढारी ऑनलाईन डेस्क
'फर्जंद' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारून मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं आपलं अभिनयाचं कौशल्य पन्हा एकदा सिध्द केलं. तर 'शिकारी'सारख्या बोल्ड चित्रपटामध्ये अभिनय करून तिने आपल्या अभिनयाची पातळी अधिक उंचावली. मृण्मयी देशपांडे 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट,' 'स्लॅमबूक' या चित्रपटांतून आणि 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून ती चाहत्यांच्या घराघरात पोहोचली. मृण्मयीने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आज (दि. २९ मे) तिचा वाढदिवस. या औचित्याने मृण्मयीचा हा सिनेप्रवास जाणून घेऊया.
मृण्मयीचा अर्थ पृथ्वी आणि हरिणाच्या डोळ्यांसारखे असाही होती. तिच्या नावाच्या अर्थाप्रमाणेच तिचे डोळे सुंदर आहेत. नेहमी चेहऱ्यावर हास्य असणारी मृण्मयी देशपांडेचं आज अनेक टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये नाव घेतलं जातं. २९ मे, १९८८ रोजी जन्मलेली मृण्यमी पुणेकर आहे. मृण्यमयीची 'फर्जंद' चित्रपटात साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. यामध्ये तिने 'केसर' नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. नटसम्राटमध्ये तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.
'शिकारी' या चित्रपटात ती अल्लड, थोडी नटखट, खोड्या करणारी अभिनेता वैभव मांगलेची मुलगी आणि नंतर अभिनेता सुव्रत जोशीच्या बायकोची भूमिका साकारली होती. शेवटची मृण्मयी देशपांडे 'मन फकीरा' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
उत्तम गायिका
मृण्मयी आणि तिची बहिण गौतमी दोघीही उत्तम गायिका आहेत. अनेक वेळा त्या दोघी त्यांचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मृण्मयी आणि गौतमी यांना गाण्याचा वारसा त्यांच्या आजीकडून मिळाला आहे. मृण्यमयी उत्तम नृत्यांगनाही आहे. तिने वयाच्या ७ व्या वर्षांपासून स्टेजवर डान्स परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.
महाविद्यालयात असताना तिने पोपटी चौकट आणि कंडीशन्स ॲप्लाय या नाटकात काम केले. मृण्मयीचा डेब्यू हिंदी चित्रपट होता- हमने जीना सीख लिया. हा चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता.
मृण्मयीने वयाच्या १८ व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या होत्या. तिचं शालेय शिक्षण रेणुका स्वरुप हायस्कूल पुणे येथे झाले. तर पुण्यातील एस. पी. कॉलेज येथे महीविद्यालयीने शिक्षण झाले.
एकापेक्षा एक चित्रपट
आंधळी कोशिंबीर, धामधूम, पुणे व्हिया बिहार, मोकळा श्वास, संशय कल्लोळ, एक कप च्या, साटं लोटं पण सगळं खोटं, मामाच्या गावाला जाऊया, नटसम्राट, शिकारी, अुनराग, बेभान, मिस यू मिस्टर असे चित्रपट तिच्या नावावर आहेत.
उद्योजकासोबत विवाह
३ डिसेंबर, २०१६ रोजी उद्योजक स्वप्नील रावसोबत मृण्मयी लग्नाच्या बेडीत अडकली. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचे शुभमंगल पार पडले होते. त्यांच्या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे दोघांच्या लग्नाचा थाट पेशवाई होता. साडीमध्ये मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. सर्वांना वाटते की, मृण्मयी-स्वप्नीलचे लव्ह मॅरेज आहे. पण, त्यांचे अरेंज मॅरेज आहे.
त्यांच्या लग्नात अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, पुष्कर श्रोत्रीसह, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, पूजा सावंत यांसह अनेक सेलिब्रेटींनी मृण्मयी-स्वप्नीलच्या लग्नाला आणि रिसेप्शनला हजेरी लावली होती.