मनोरंजन

एकेकाळी ८६ किलाेची साेनम कपूरने ३५ किलो वजन कमी करण्यासाठी केल्या ‘या’ गोष्टी!

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेतत असते. रियल लाईफमध्येदेखील फिटनेससाठी ती सजग राहते. आज ९ जून रोजी सोनमचा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का, चित्रपटात येण्यापूर्वी तिचं खूप वजन होतं. मीडिया रिपोर्टनुसार, तिचं तब्बल ८६ किलो वजन होतं. त्याचप्रमाणे ती 'पीसीओडी'ने ग्रस्त असल्याने वजन कमी करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. 

सुंदर फिगर आणि बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट फॅशन सेन्स असणारी अभिनेत्री म्हणून सोनम कपूरची ओळख आहे. परफेक्ट डाएट आणि वर्कआउट करून तिने जवळपास आपले ३५ किलो वजन घटवले. पण, इतके वजन घटवण्यासाठी तिला काय काय करावे लागले, पाहुया.

सोनम कपूरची वेट लॉस जर्नी

वयाच्या १९ व्या वर्षी सोनमचं वजन ८६ किलो होतं. सोनम कपूरला जेव्हा सावरिया चित्रपटाची ऑफर मिळाली. तेव्हा तिने वजन घटवण्यासाठी निर्णय घेतला. तिने हेल्दी लाईफस्टाईल आणि स्ट्रिक डाएट प्लॅन फॉलो करून जवळपास दोन वर्षात ३५ किलो वजन कमी केलं. तिची वेट लॉस जर्नी अजूनही इतर लोकांसाठी प्रेरणादायी बनली आहे. 

कथ्थक

आपला पॉश्चर आणि स्टॅबिलिटी सुधारण्यासाठी सोनमने कथ्थक करणं सुरू केलं. ती म्हणते, कथ्थकमुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होतात. तसेच बॉडी टोन होण्यासाठी मदत होते.

कार्डिओ

ती स्ट्रिक्ट वर्कआउट रूटीनदेखील फॉलो करते. वेट ट्रेनिंग, स्विमिंग, डान्सिंगसोबतचं स्क्वॅशदेखील ती खेळते. ती रोज ३० मिनिट कार्डिओ करते. 

जंक फूड ठेवते दूर 

सर्वातआधी तिने जंक फूड खाणे सोडले. त्याचप्रमाणे ती फ्राईड फूड आयटम, चॉकलेट आणि आइसक्रीमदेखील खाणे सोडले. याचे पूर्ण क्रेडिट ती आपल्या आईला देते. 

​पॉवर योगा

आपल्या बॉडी शेपला सुधारण्यासाठी सोनमने आपल्या दैनंदिन रूटीनमध्ये योगासन आणि वर्कआउट केले. त्याचप्रमाणे तिने पॉवर योगामध्य़ेही आपले हात आजमावले. यामुळे वजन घटवण्यासाठी तिला खूप मदत झाली. 

सोनम कपूरचा डाएट प्लान

वजन घटवण्यासाठी  सोनम कपूरने तळलेले-भाजलेले फूड्स आणि गोड पदार्थ खाणं सोडून दिले. प्रत्येक दोन तासाला शेंगदाणे, सफरचंद आणि ड्राय फ्रूट्स खाणे सुरू केले. तिने आपल्या डाएटमध्ये अधिक प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहाराचा समावेश करते. 

डिटॉक्‍स वॉटर: सोनम एक ग्लास कोमट लिंबू पाण्यासोबत आपल्या दिवसाची सुरूवात करते. 

ब्रेकफास्ट: ओटमील आणि फळे.

पोस्ट-वर्कआउट स्नॅक: ब्राउन ब्रेडसोबत अंड्याचा पांढरा भाग घेते. 

ब्रेकफास्ट आणि लंच दरम्यान: प्रोटीन शेक, ज्यूस घेते.

दुपारचे जेवण: एक वाटी डाळ, एक  वाटी भाजी, एक नाचणीची भाकरी, सॅलड आणि चिकन व मासा. 

संध्याकाळचे स्नॅक्स: हाय-फायबर क्रॅकर्स, चिकन कोल्ड कट वा अंड्याचा पांढरा भाग.

रात्रीचे जेवण: सूप, सॅलड आणि चिकन, मासाचा एक तुकडा. 

दिवसातून ५ ते ६ वेळा पौष्टिक आहाराचा समोवश ती आपल्या खाण्यात करत असते. त्याशिवाय, ती आपल्या डायट विशेषज्ञांकडून निर्धारित डाएटचे पालन करते.

सोनम कपूरने लाईफ स्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या सवयी बदलून आपले वजन घटवले आहे. जर तुम्हीही लठ्ठपणापासून त्रस्त आहात तर सोनमच्या वेट लॉस जर्नीपासून प्रेरणा घेऊ शकता. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT