अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या 'देसी बॉईज' मध्ये ब्रूना अब्दुल्लाने (Bruna Abdullah) काम केलं आहे. प्रसिध्द गाणे 'सुबह होने न दे' मध्ये दिसलेली ब्राजिलियन अभिनेत्री आणि मॉडल ब्रूना अब्दुल्ला खरंतरं भारतात सुट्टीसाठी आली होती. पण, नशीब तर बघा! सुट्टीसाठी ती भारतात आली. आणि येथे तिने (Bruna Abdullah) बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
ब्रुनाने अभिनयाची सुरुवात २००७ मधून केली होती. ती एक मॉडलदेखील आहे. हिंदी चित्रपटांशिवाय तिने तमिळ चित्रपटांमध्येही काम केलंय.
ब्राझीलची ब्रूना सुट्टीसाठी भारतात आली होती. तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'कॅश'मध्ये तिने एक आयटम सॉन्ग केलं. 'रेहम करे' या आयटम सॉन्गमधून तिनं डेब्यू केलं होतं.
ब्रूना ग्रँड मस्ती, देसी बॉईज, आय हेट लव्ह स्टोरी, जय हो, मस्तीजादे, ये तो टू मच हो गया यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. तिने टीव्ही जाहिरातींमध्येही अभिनय केलाय. तिने 'शेखर सुमन' यांच्या म्युझिक अल्बममध्येही अभिनय केला होता.
याशिवाय तिने रिॲलिटी शोजदेखील केले आहेत. यामध्ये 'खतरों के खिलाडी', 'नच बलिए सीजन ६' आणि 'कॉमेडी क्लासेज' या शोंचा समावेश आहे.
ब्रुनाने छोट्या पडद्य़ावर २००८ मध्ये कलर्स टीव्हीवरील डान्स रिॲलिटी शो 'डांसिंग क्वीन'मध्ये भाग घेतला होता. २००९ मध्ये कलर्स टीव्हीवरील स्टंट रिॲलिटी शो 'फियर फॅक्टर – खतरों के खिलाडी'मध्ये पाहण्यात आलं होतं.
त्यानंतर ब्रुनाने २०१३ मध्ये स्टार प्लस डान्स रिॲलिटी शो 'नच बलिए सीजन ६' मध्ये भाग घेतला होता. २०१४ मध्ये ब्रुनाला लाईफ ओकेवरील शो 'कॉमेडी क्लासेज'मध्ये पाहण्यात आलं होतं. तिने 'नॅन्सी' नावाची भूमिका साकारली होती.
ब्रूनाला एक मुलगी आहे. तिने आपल्या बाळाचा फोटोदेखील शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर तिने हा फोटो पोस्ट करून बाळाच्या नावाचा खुलासा केला होता. तिच्या बाळाचं ईसाबेल असे नाव ठेवलं.
ब्रूनाने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिली की, 'मला माझ्या परिवारातील नव्या सदस्याला भेटून खूप अभिमान आणि आनंद वाटतोय. ईसाबेल. तिचा जन्म मुंबईत ३१ ऑगस्टला झाला. आम्ही खूप खुश आहोत. तिच्य़ावरून माझी नजरचं नाही हटली.'
ती प्रेग्नेंट असताना तिच्या प्रेग्नेंसीची प्रत्येक अपडेट तिने आपल्या फॅन्ससोबत फोटो शेअर करून दिले होते. ब्रूनाचं लग्न स्कॉटिश बॉयफ्रेंड एलन फ्रेजरशी झालं. दोघांनी २५ जुलै, २०१८ मध्ये साखरपुडा केला होता.
ब्रूनाने एका मुलाखतीत प्रेग्नेंसीचा खुलासा केला होता. ती लग्नाआधी आई झाली होती. या मुलाखतीदरम्यान, ती म्हणाली- 'लग्नाचं सर्टिफिकेट केवळ एक कागदाचा तुकडा असतो. दोन लोकांना एकत्र राहण्यासाठी ते पुरेस नाही. काही लोकांचा घटस्फोट होतो. तर काही लग्न न करता राहतात, प्रेम एकमेकांना जवळ ठेवतो. बाकी काहीच नाही.'