Hanuman Ansh OTT Release Date Pudhari
मनोरंजन

Hanuman Ansh OTT Release: बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणारा ‘हनुमान अंश’ आता घरबसल्या पाहता येणार; कुठे आणि कधी?

Hanuman Ansh OTT Release: ‘हनुमान अंश’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ पासून Sony LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Rahul Shelke

Hanuman Ansh OTT Release: अध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवले आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ९० दिवसांत तब्बल ४५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमी बजेट, मर्यादित प्रमोशन आणि प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

आता चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून, लवकरच प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांना आता ओटीटीवर पाहता येईल.

‘हनुमान अंश’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

‘हनुमान अंश’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट Sony LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २७ नोव्हेंबर २०२६ पासून प्रेक्षकांना हा चित्रपट ऑनलाइन पाहता येणार आहे.

नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून प्रेक्षकांना अध्यात्म, श्रद्धा आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा मेसेज देण्यात आला आहे. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

२ कोटींच्या बजेटमध्ये ४५३ कोटींची कमाई!

‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शनानंतर ९० दिवसांत या चित्रपटाने तब्बल ४५३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे बजेट अवघे २ कोटी रुपये होते.

म्हणजेच चित्रपटाने आपल्या बजेटच्या तब्बल २२७ पट कमाई केली आहे. सुरुवातीला या चित्रपटाकडून एवढ्या मोठ्या कमाईची अपेक्षा नव्हती. मात्र, प्रेक्षकांच्या पसंतीमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवले.

चित्रपटगृहांमधून काही काळ बाहेर पडल्यानंतरही या चित्रपटाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. ९० दिवसांनंतरही चित्रपटाची कमाई सुरू असून, सध्या दररोज सरासरी १० लाख रुपयांची कमाई होत असल्याचे सांगितले जात आहे.

आता थिएटरमधील यशानंतर ‘हनुमान अंश’ ओटीटीवर किती लोकप्रिय ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २७ नोव्हेंबरपासून Sony LIV वर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवरही नवे विक्रम करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT