मनोरंजन

मराठी चित्रपटात अनोखा विषय घेऊन येत आहे ‘हलगट’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक वेगळा विषय घेऊन येत आहे 'हलगट' चित्रपट. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये दिसणारं एक माणूस हातात सोन्याचे दागिने घेऊन स्मित देताना दिसत आहे. त्याच्या डोळ्यांवर असणाऱ्या गॉगलमध्ये एका बाजूला एक पुरुष आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्री विशिष्ट गोष्टीला अनुसरून आशेने बघताना दिसत आहे. एकूणच पोस्टर सोनेरी रंगाने माखलेला दिसत असून एक गूढ आणि रहस्यमय गोष्टीकडे आकर्षित करत आहे.

अधिक वाचा –

कर्णन फिल्म्स निर्मित आणि आयमॅक्स टिव्ही डिजिटल प्रस्तुत हलगट चित्रपटाचे दिग्दर्शन करण सुमन अर्जुन यांनी केले आहे. बाबुराव केशव घोंगडे, अभिजीत सांघवी, जीवन माधव लहसे आणि करण सुमन अर्जुन हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश अवारी हे सह-निर्माते आहेत.

अधिक वाचा –

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अभिजीत कुलकर्णी, छायाचित्रण अन्सार खान, संकलन संतोष घोठोस्कर, निर्मिती व्यवस्थापक विष्णू घोरपडे, संगीत निलेश पाटील, गीत पद्माकर मलकापुरे, पार्श्वसंगीत अजिंक्य जैन, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा पूजा विश्वकर्मा, कला दिग्दर्शन जगदीश, पोस्ट प्रोडक्शन जयेश मलकापूरे यांचे आहे.

SCROLL FOR NEXT