Gulshan Devaiah-Girija Oak actress shared Intimate scene experience  instagram
मनोरंजन

Gulshan Devaiah-Girija Oak Intimate scene : इंटीमेट सीनवेळी गुलशन देवैयाने 'या' अभिनेत्रीला विचारला 'तो' प्रश्न, सेटवर घडला होता हा प्रकार

Therapy Sherapy movie Intimate scene : इंटीमेट सीनवेळी गुलशन देवैयाने 'या' अभिनेत्रीला विचारला 'तो' प्रश्न, गिरीजा ओकने सांगितला किस्सा

स्वालिया न. शिकलगार

वेब सिरीज “Therapy Sherapy”मधील इंटीमेट सीनच्या शूटिंगदरम्यान, गुलशन देवय्याने गिरीजा ओक गोडबोलेची काळजी घेतली. त्याने विविध प्रकारच्या उश्या आणून तिच्यासाठी आरामदायी ठरेल, असे वातावरण तयार केले आणि सीनदरम्यान अंदाजे १६-१७ वेळा “तुम ठीक आहात का?”

Gulshan Devaiah-Girija Oak Intimate scene

मुंबई - गुलशन देवैया सध्या 'कांतारा: चॅप्टर १' च्या यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एका विलेनची भूमिका साकारली होती. या यशानंतर थेरेपी शेरेपी नावाची त्याची एक सीरीज येत आहे. यामध्ये तो अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सोबत दिसणार आहे.

सध्या सस्पेंस-थ्रिलर चित्रपट आणि सीरीजची सध्या चलती आहे. आता अशी एक वेब सीरीज येत आहे, ज्याचे नाव आहे -‘थेरेपी शेरेपी’. ही मेंटल हेल्थवर आधारित सायकलॉजिकल थ्रिलर सीरीज असेल.

सेटवर घडली होती ती घटना- गिरीजा

मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले आगामी वेब सीरीज थेरेपी शेरेपी मध्ये गुलशन देवैया सोबत दिसणार आहे. या सीरीजमध्ये तिने गुलशनसोबत अनेक इंटीमेट सीन्स दिले आहेत.. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने या शूटबद्दल सांगितले. तिने गुलशनचे भरभरून कौतुक केले. तिने सांगितले की, कशाप्रकारे गुलशनने सेटवर एक पाऊल पुढे जाऊन तिच्यासाठी वातावरण सहज बनवलं.

काय म्हणाली गिरीजा ओक?

शूटिंगदरम्यान गुलशनने त्यांच्या वॅनिटी व्हॅनमधून तीन-चार विविध प्रकारचे उशी आणल्या — एक लहान, एक मोठी, एक मुलायम आणि एक थोडी घट्ट. गिरीजाला विचारलं गेलं की “हा उशीपैकी कोणती तुला आरामदायी वाटेल?” आणि मग त्या उशीचा वापर करण्यात आला. त्या सीनदरम्यान गुलशनने अंदाजे १६ ते १७ वेळा विचारलं, “तुम्ही ठीक आहात का?”

गिरीजा म्हणाली की, “एका क्षणी मी अस्वस्थ झाले होते, तेव्हा गुलशनने ताबडतोब विचारलं की ‘जर तुला हटवायची वाट असेल तर मला काही समस्या नाही.’ असे त्याने सांगितल.” “हा अनुभव इतका चांगला आहे की, कारण तो गुलशन आहे. कदाचित दुसऱ्याबरोबर तो इतका सहज झाला नसता.”

गिरीजाने सांगितले की, कशाप्रकारे गुलशन सेटवर तिची काळजी घ्यायचा. गुलशन त्या निवडक अभिनेत्यांपैकी एक होते, ज्याच्यासोबत मला अस्वस्थता वाटली नव्हती.

तिने पुढे सांगितले की, या गोष्टीचा काही फरक पडत नाही की, तुम्ही कितीही तयारी करा. पण काही लोक असे असतात की, ज्याच्यासोबत तुम्ही झिरो डिस्कम्फर्ट फील करता. गुलशन त्यापैकी एक आहे.

गुलशन देवैया आणि गिरीजा ओक गोडबोले स्टारर थेरेपी शेरपीची रिलीज डेटची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT