गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या अनेकदा कानावर येत असतात. पण अनेकदा अशा चर्चा सुरू असतानाच हे दोघे एकत्र येतात आणि त्या चर्चांना पूर्णविराम लावतात. पण आता एका पॉडकास्टमध्ये सुनीताने एक खळबळजनक खुलासा केला आहे. सुनीता म्हणतात, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा खुलासा केला आहे. यासोबतच तिने महिलांना पतीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून न राहता स्वत:ही काही उत्पन्नाचा सोर्स शोधण्याचे सुचवले आहे. (Latest EnEntertainment News)
याबाबत बोलताना त्या म्हणल्या की, स्वतच्या कमाईचा आनंद वेगळाच असतो. दहा वेळा मागितल्याशिवाय नवरा पैसे देत नाही अशावेळी स्वत:च्या कमाईतून खर्च करण्याचे स्वातंत्र्य हवे.
सुनीता पुढे म्हणतात की, मला गोविंदाकडे एक मोठे घर मागायचे आहे. सध्या तो आमच्यासोबत राहत नाही. आमचे घर मला आणि माझ्या दोन मुलांना छोटे पडते त्यामुळे मला गोविंदाला सांगायचे आहे. चिची, मला मोठा हॉल असलेलं पाच बेडरूमचं घर विकत घे, नाहीतर बघ तुझं काय होतं ते.
मी अनेकदा ऐकले आहे पण मिडियाला मी हे सांगू इच्छिते की जोपर्यंत मी प्रत्यक्ष काही पाहत नाही किंवा ऐकत तोपर्यंत मी काहीही करू शकत नाही. मी खोटे बोलत नाही. त्यामुळे याबाबतचे सत्य मीच तुम्हाला सांगेन. मी असे ऐकले आहे की ती मराठी अभिनेत्री आहे.
गोविंदा सध्या मुलगा यश आणि मुलगी टिना याना बॉलीवुडमध्ये सेटल करण्याच्या प्रयत्नात आहे.