पुढारी ऑनलाईन डेस्क - जळगावातील एका रोड शोमध्ये सहभागी झालेले गोविंदा यांची अनेक तब्येत बिघडल्याने त्यांना रोड शो सोडून परतावे लागले. तब्येत बिघडल्यानंतर गोविंदा मुंबईत परतले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अद्यापबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना हा रोड शो मधून सोडावा लागला. गोविंदा यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले की, आता अभिनेते ठिक आहेत. ते थकले आहेत. त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आहे. तर निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. गोविंदा यांच्या पायात बंदुकीची गोळी लागली होती. डॉक्टरांनी काही दिवस घरीच एक्सरसाईज आणि फिजिओथेरपीचा सल्ला दिला होता. बंदुकीची गोळी लागल्यानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गोविंदा म्हणाले, येथे लोकांनी मला खूप प्रेम दिलं आहे. आता माझ्या छातीत दुखत आहे. माझी तब्येत ठिक नाही. मी कुठलेही रिस्क घेऊ शकत नाही आणि मला हा रोड शो मधून सोडावं लागेल.