पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi ५) घरात दररोज नवनविन टास्क पाहायला मिळतात. या टास्कमध्ये कोण जिंकतो तर कोणाला आपला पराभव स्विकारावा लागतो. बिग बॉसमध्ये गेला आठवडा अभिनेत्री निक्की तांबोळीने खुपच गाजविला. मात्र, आता या घरातून एका व्यक्तीला बाहेर पडावे लागणार आहे. या आठवड्यात सर्वाचा लाडका छोटा पुढारी म्हणजे, घन:श्याम दरवडे एलिमिनेट झाला आहे. यामुळे त्याचा आता बिग बॉस घरातील प्रवास संपला आहे.
घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल हे सात स्पर्धक आठवड्यात बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट झाले होते. दरम्यान यातील अभिजित सावंत आणि धनंजय पोवार हे स्पर्धक अनेकवेळा नॉमिनेट झाले, पंरतु, चाहत्यांनी भरभरून वोट दिल्यामुळे ते अद्याप कायम टिकून आहेत. दरम्यान या आठवड्यात कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? यांची उत्सुकता सर्वाना लागली होती.
यानंतर बिग बॉस मराठी ५ च्या घरात आर्या, अभिजित, धनंजय आणि सुरज चव्हाण वाचले आहेत. तर सर्वाचा लाडका छोटा पुढारी म्हणजे, घन:श्याम दरवडे एलिमिनेट झाला आहे. यामुळे या आठवड्यात त्याला घरातून बाहेर पडावे लागले आहे. या आठवड्यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या घराचा कॅप्टन आहे. यानंतर घरात मोठी घडामोड घडणार असल्याने सुरजला मोठी जबाबदारीही पेलावी लागणार आहे. यापुढे अशाच अनेक रंजक गोष्टी चाहत्यांना बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहे.