मनोरंजन

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘गेट टुगेदर’ चित्रपटाचा टीजर लाँच

स्वालिया न. शिकलगार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न "गेट टुगेदर" या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीजर नुकताच लाँच करण्यात असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १९ मे पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_title" view="list" /]

"देवमाणूस" या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीजरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. चित्रपटाचा टीजर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT