'आधी दारू पाजली आणि मग...' कास्टिंग काऊचविषयी गहनाचा धक्कादायक खुलासा  Gehana Vasisth
मनोरंजन

'आधी दारू पाजली आणि मग...' कास्टिंग काऊचविषयी Gehana Vasisthचा धक्कादायक खुलासा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचविषयी स्पष्टपणे, उघडपणे बोलत आहेत. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री गहना वशिष्ठने दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप करत धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठने नुकतेच एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टीचा उघडपणे खुलासा केला. यात तिने तिचे अनुभव सांगताना कास्टिंग काऊचबद्दलचा मोठा धक्कादायक खुलासा केला. यावेळी तिने सुरूवातीला मला दारू पाजली आणि नंतर माझ्यावर बलात्कार केल्याचे म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

''लहानपणापासून माझे अभिनेत्री होण्याचे स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुंबईत आले होते. यावेळी मला जास्त करून एक ते दोन प्रोडक्शन हाऊसची माहिती होती. म्हणून मी सुरूवातीला बालाजी टेलिफिल्म्स भेट दिली. यावेळी मला प्रवीण जोहान नावाची एक व्यक्ती भेटली आणि त्याने मला दिग्दर्शक असल्याचे सांगितले. मीही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि फसले.'' असे तिने मुलाखतीत म्हटलं आहे.

यापुढे ''नंतर त्याने मला एका इंटिमेट सीनसाठी डेमो द्यायला आहे असे सांगून त्याच्या घरी बोलविलं. यावेळी त्याने मला दारू प्यावी लागेल असेही सांगितले. मला वाटलं की, चित्रपटात काम करायला मिळणार आहे. या आशेने मी हा सीन करण्यास तयार झाले. दरम्यान त्याने मला सुरूवातीला जरा-जरा म्हणत खूपच दारू पाजली. आणि नंतर मी नशेत असताना त्याने माझ्यावर बलात्कार केला. नसेत असताना त्याने माझा गैरफायदा घेतला. मी छत्तीसगडमधील एका छोट्या गावतून आहे'' असे तिने यावेळी सांगितले.

गहनाने अनेक निर्माते आणि म्युझिक कंपन्यांवरही आरोप केले आहेत. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतून काढून टाकतील या भितीने मी इतकी दिवस गप्प राहिली असल्याचेही तिने सांगितले. याआधी राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी केसमध्ये गहना वशिष्ठ चर्चेत आली होती.

Gehana Vasisth, casting couch, shocking revelations, alcohol, Bollywood, entertainment news, casting couch allegations

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT