२०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी नव्या कलाकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. स्टारकिड्सनी मोठ्या अपेक्षांसह पदार्पण केले, तर अनेक नॉन-फिल्म बॅकग्राऊंडमधील कलाकारांनी आपल्या अभिनयाने लक्ष वेधले. पण मोजक्याच कलाकारांना यश मिळाले.
bollywood debut in 2025
केवळ स्टारकिड्सचं नव्हे तर अन्य कलाकारांनीही यंदाच्या वर्षात सिने जगतातून डेब्यू केलं आहे. २०२५ मध्ये काही नवीन, स्टारकिड नसलेले पण चर्चेत आलेले नवे चेहरे देखील पाहायला मिळाले. या वर्षात Gen-Z कलाकार आणि Next-Gen स्टारकिड्स यांचा प्रभाव दिसून आला. काही खास कथा आणि चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकले. तर काहींना सपशेल अपयश आले. स्टारकिड असूनही काही चित्रपट महाफ्लॉप ठरले.
स्टारकिड्स डेब्यू -
राशा थडानी - रवीना टंडन आणि अनिल थडाणी यांची मुलगी. १७ जानेवारी रोजी आजाद चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
शनाया कपूर - बॉलीवुड सुपरस्टार अनिल कपूरची भाची आणि अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनायाने 'आंखों की गुस्ताखियां'मधून डेब्यू केला होता. विक्रांत मेसीसोबत तिने डेब्यू केला. २० कोटींच्या बजेटमधील चित्रपटाने केवळ ३० लाख ओपनिंग ३० लाख रुपये होते. एकूण कलेक्शन १.७१ कोटी रुपये होते.
आर्यन खान- शाहरुख खानचा लाडला आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. त्याची वेब सीरीज The Bads of Bollywood ची खूप चर्चा झाली. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली.
इब्राहिम अली खान - सैफ अली खान - अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानने नादानियां' मधून डेब्यू केला. खुशी कपूर सोबत ओटीटीवर रिलीज झाला. त्याचा डेब्यू फ्लॉप झाला.
नवीन चेहरे -
Aneet Padda- सैयारामध्ये अभिनयासाठी प्रशंसा मिळवलेली नवोदित अभिनेत्री अनित पड्डा होय. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले असले तरी तिचा हा पहिलाच चित्रपट होता.
Nitanshi Goel - लापता लेडीजच्या माध्यमातून डेब्यू करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी प्रतिभावान, कमी वयाची अभिनेत्री नितांशी गोयल होय.