मनोरंजन

‘रनवे 34’ चा आला टीझर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना महामारीने उसंत घेतल्यावर आता बॉलीवूडमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग वाढली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे टीझर, ट्रेलर बाहेर पडत आहेत. आता अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या 'रनवे 34' या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खुद्द अजयनेच सोशल मीडियातून हा टीझर शेअर केला. त्याने लिहिले आहे की 'सच जमीन से 35,000 फीट ऊपर छुपा हुआ है!' या चित्रपटात रकुल प्रीत सिंह ही सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे. 29 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT