Farhan Akhtar  
मनोरंजन

Farhan Akhtar : ऑस्ट्रेलियातील माझ्या चाहत्यांनो…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : गेल्या वर्षी अनेक बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. खिलाडी अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटही काहीच जादू दाखवू शकला नाही. याचाच परिणाम म्हणून त्याचा एक लाईव्ह कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर त्यापाठोपाठ अभिनेता फरहान अख्तर यानेदेखील त्याचा परदेशी होणारा एक कॉन्सर्ट रद्द केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

फरहान उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्कृष्ट गायकही आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यासोबतच त्याचा स्वतःचा बँडही आहे. जगभरातल्या विविध शहरांत त्याचे कॉन्सर्ट होतात, तर लवकरच तो ऑस्ट्रेलियात त्याचा एक लाईव्ह कार्यक्रम करणार होता. मात्र आता काही कारणाने तो रद्द करण्यात आला आहे.

फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने हा त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याचे सांगितले. 'माझ्या ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनो, काही कारणांमुळे बँड फरहान लाईव्हला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागत आहे. यासाठी मी माझी निराशा तुमच्याशी शेअर करत आहे.' असे फरहानने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT