मनोरंजन

फेसबुक बॅन झाल्यास शालूच्या पोस्टवर गुळ पाडणा-याचं दुकान बंद पडणार का?

Pudhari News

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क 

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांचा गाजलेल्या 'फँड्री' या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात अनेकांच्या हृदयावर राज्य करते आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. फेसबुक, इन्स्टाग्रामवरच्या तिच्या पोस्टची तर चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. आपले वैविध्यपूर्ण वेशभूषेतील फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर शालू चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता केंद्र सरकारने सोशल मीडिया नेटवर्किंग साईट्सबाबत नवे धोरणा आखले आहे. त्यामुळे कदाचित उद्यापासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम भारतात बॅन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा धसका शालूच्या चाहत्यांनी घेतला असून आता शालूला भेटाय कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

शालू अर्थात राजेश्वरी ही शोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिच्या एका-एका व्हिडीओ आणि  फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. मात्र आता ही फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार असल्याच्या चर्चांनी ती स्वत: ही नाराज झाली आहे.

सोशल मीडिया कंपन्यांविरोधात केंद्र सरकारनं कडक धोर अवलंबलं आहे. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग कंपन्यांना नियमावलींचं पालन करण्याचे आदेश दिले होते. नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. २६ मे पासून नवे नीयम लागू होणार आहेत. आज (२५ मे) ही मुदत संपत आहे. मात्र अंतिम मुदत संपत आली तरी फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांनी सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना लागू केलेल्या नाहीत. ज्यामुळे देशात कार्यरत असणार्‍या या बड्या सोशल नेटवर्किंग साईट्स उद्यापासून बंद होणार की काय याची चिंता अनेक कोट्यवधी युझर्सना लागून राहिली आहे. 

कोट्यवधी युझर्समध्ये शालूच्या हजारो चाहत्यांचा समावेश आहे. हे चाहते मंडळी नेहमीच शालूच्या नवनव्या पोस्ट लाईक करून भन्नाट कमेंट करत असतात. पण केंद्र सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांविरोधात कडक धोर अवलंबलं आहे. त्यामुळे उद्यापासून फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार काय अशी चिंता खुद्द शालूसह तिच्या चाहत्यांना लागून राहिली. सूत्रांकडून असंही समजतंय की आजची रात्र हे सर्व जब्या मंडळी जागून काढणार आहेत. कारण जर या सोशल नेटवर्कींग साईटस् चालू राहिल्या आणि आनंदाच्या भरात शालूनं दिलासा देणारी पोस्ट टाकली तर त्याला पहिला कोण लाईक आणि कमेंट करणार याची स्पर्धा सर्व जब्या मंडळींमध्ये लागली आहे. ही पण माहिती सूत्रांकडूनच समजली आहे. 

दरम्यान फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार म्हणून शालूही भावूक झाली आहे. गलबलून तिने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. शालू म्हणते; उद्यापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्वीटर कदाचित भारतामध्ये बंद होतील म्हणजेच बंद होतील, असे समजले आहे. असे झालेच तर मित्रानो तुम्हा सर्वांची खूप खूप जास्त आठवण येईल मला.

शालूने पोस्टमध्ये काय म्हटलंय… 

उद्यापासून Facebook, Instagram & Twitter कदाचित भारतामध्ये बंद होतील म्हणजेच ban होतील, असे समजले आहे. 

असे झालेच तर मित्रानो तुम्हा सर्वांची खूप खूप जास्त आठवण येईल मला.

आपण सर्वांनी दिलेले प्रेम हे अमूल्य आहे. 

सरकार जे काही निर्णय घेत आहे तो काही कारणाने बरोबर आहे, म्हणुन आपण कोणताही एखादा नवीन भारतीय (Made In India) App वर connect होऊया. 

आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, तेव्हा let's wait and watch. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT