actor Dharmendra passed away Instagarm
मनोरंजन

Evergreen Dharmendra | अभिजात व्यक्तिमत्त्व! खरा हीरो तर हाच!... एव्हरग्रीन धर्मेंद्र

Evergreen Dharmendra | अभिजात व्यक्तिमत्त्व! खरा हीरो तर हाच!... एव्हरग्रीन धर्मेंद्र

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडचा एव्हरग्रीन आणि अभिजात अभिनेता धर्मेंद्र आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. नैसर्गिक अभिनय, देखणा अंदाज आणि साधेपणामुळे तो खऱ्या अर्थाने ‘रिअल हीरो’ मानला जातो.

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला होता. एक अभिनेता , निर्माता म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी जी अमिट छाप सोडलीय, ती आजदेखील सदाबहार आहे. एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देणाऱ्या कलाकारांपैकी एक ते मानले जात होते. आपल्या सिनेकारकिर्दीत, त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून पदार्पण केले होते. १९६० च्या दशकाच्या मध्यात आये मिलन की बेला , फूल और पत्थर आणि आये दिन बहार के यांसारख्या चित्रपटांमघून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि नंतरच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटांमधील अनेक ऑन-स्क्रीन भूमिकांसाठी भारताचा "ही-मॅन" म्हणून ओळखले गेले.

आँखें , शिकार , आया सावन झूम के , जीवन मृत्यु , मेरा गाव मेरा देश , सीता और गीता , राजा जानी , जुगनू किसी बात , या बात , राजा जानी . , चरस , धरम वीर , चाचा भटिजा , गुलामी , हुकूमत , आग ही आग , इलान-ए-जंग आणि तहलका , अनपध , बंदिनी , हकीकत , जमाना , समाधी , रेशम की डोरी , चुपके चुपके , दिल्लगी , द बर्निंग ट्रेन , गजब , दो दिशाएं आणि हात्यार. तसेच १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, तो प्यार किया तो डरना क्या , लाइफ इन ए... मेट्रो , अपने , जॉनी गद्दार , यमला पगला दीवाना , रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों आईं जी यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी दिले. १९९७ मध्ये, बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. केवळ अभिनेतेच नाही तर राजकारणातही नशीब आजमवले.

धर्मेंद्र यांचे लग्न प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झाले होते. बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा घडल्या, पण हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकथेचं आकर्षण आजही कमी झालेलं दिसत नाही. ड्रीमह गर्लवरचं प्रेम चित्रपटांच्या पडद्यावर सुरू झालं आणि आयुष्यातही फुलत गेलं.

अभिनेता धर्मेंद्र चित्रपटात येण्‍यापूर्वी त्‍यांचं लग्‍न प्रकाश कौर यांच्‍याशी झालं होतं. धर्मेंद्र १९५८ मध्‍ये चित्रपटात आले. त्‍यांचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे.' तर हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता...'सपनों का सौदागर'. हा चित्रपट १९६८ मध्‍ये झाला होता. १९७० मध्‍ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पहिल्‍यांदाच एकत्र दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर हेमा आणि धर्मेंद्र यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.

पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही मिळत राहिल्या ऑफर

आपला पहिला चित्रपट सपनों का सौदागरबद्‍दल ) हेमा मालिनी एकदा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'माझा पहिला चित्रपट चालला नाही, तरीही तो रिलीज झाल्यानंतर मला बरेच चित्रपट मिळाले, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल. तो का चालला नाही, मला आजवर कळलेलं नाही. सुदैवाने त्‍याच्‍यानंतर मला मिळालेले बहुतेक चित्रपट चांगले चालले. सपनों का सौदागरच्या अपयशाचे दु:ख कुणालाच नव्‍हते. चित्रपट पूर्ण झाला आणि थिएटरमध्‍ये लागला, हेच माझ्‍यादृष्‍टीने खूप मोठं होतं...'

१९७० नंतर एका मागोमाग एक हेमा आणि धर्मेंद्र एकत्र चित्रपटांत काम करू लागले. दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. धर्मेंद्र विवाहीत होते. परंतु, दुसरं लग्‍न करणं धर्माविरुध्‍द होतं. हेमा मालिनी दाक्षिणात्‍य कुटुंबातील होत्‍या. चित्रपट 'शोले'पर्यंत (१९७५) हेमा-धर्मेंद्र यांच्‍यातील प्रेम वाढत गेलं.

...अन् धर्मेंद्र नाव बदललं

धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करवून घेतल्याचे म्हटले जाते. शिवाय, पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्वीकारली आणि दोघे १९७९ साली विवाहबद्ध झाले.

धर्मेंद्र आणि हेमा यांचे एकत्र चित्रपट

धर्मेंद्र - हेमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'नया जमाना,' ,' 'अलीबाबा और ४० चोर,' 'आसपास,' 'सीता और गीता,' 'राजा जानी,' 'पायल,' 'प्रतिज्ञा,' 'बर्न‍िंग ट्रेन,' 'दिल का हीरा'रजिया सुल्‍तान' इत्यादी चित्रपटात या कपलने एकत्र काम केले होते.

इतर भाषांमधील चित्रपट

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी जगन्नाथ चॅटर्जी दिग्दर्शित ' पारी' (१९६६) या बंगाली चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि केश्तो मुखर्जी यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. पंजाबी चित्रपटांमध्ये कंकण दे ओहले (१९७०), दो शेर (१९७४), दुख भंजन तेरा नाम (१९७४), तेरी मेरी इक जिंदरी (१९७५), पुट्ट जट्टन दे (१९८२) आणि कुर्बानी जट्ट दी (१९९०) मध्ये अभिनय केला आहे. २०१४ मध्ये आलेल्या 'डबल डी ट्रबल' चित्रपटातून ते पंजाबी चित्रपटसृष्टीत परतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT